मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे पैठण - औरंगाबाद रस्त्यावर भव्य रास्तारोको लक्षवेधी आंदोलनपैठण (प्रतिनीधी विजय खडसन)
 
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम स्थगिती मिळाल्यानंतर मराठा क्रांती ठोक मोर्चा तर्फे 
२८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. महाविकास आघाडी सरकार विरोधात लक्षवेधी रास्तारोको आंदोलन करण्यात आले.जवळपास औरंगाबाद - पैठण रोडवरील वाहातुक काही काळ ठप्प झाली होती.यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाने जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत सर्वच राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली असल्याचा फलक आंदोलनास्थळी लावण्यात आला आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.मराठा समाजाला राज्य सरकारने  दिलेले सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरते स्थगित केले. या निर्णयामुळे राज्यातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.मराठा समाजाच्या उमेदवारांना नोकरीच्या राखीव जागापासून वंचित रहावे लागत आहे.मराठा समाजाची आर्थिक सामाजिक परिस्थिती अत्यंत खालावलेली आहे हे राज्य मागास आयोगाच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे.असे असताना मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने काढून घेण्यात आले.आरक्षणाला मिळालेली स्थगिती तात्काळ उठविण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करावा व मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या प्रलंबित मागण्या तात्काळ मान्य करण्यात याव्यात त्यासाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती ठोक मोर्चाने आंदोलन करीत राज्यभरात तिव्र आंदोलन करण्याचा इशारा केंद्र व राज्य सरकारला दिला आहे.यावेळी राज्याचे मुख्यमंञी उद्धव ठाकरे व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना पैठणचे तहसिलदार चंद्रकांत शेळके यांच्या मार्फत मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या मागण्याचे निवेदन देण्यात आले.याप्रसंगी प्रशिक्षणार्थी आय.पि.एस.पैठण उपविभागिय पोलीस अधिकारी गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पैठण एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या स.पो.नि.अर्चना पाटील यांनी तगडा बंदोबस्त  ठेवला होता.यावेळी दंगा काबु नियंञण पथकालाही पाचारण करण्यात आले होते.
या अंतर्गत आज मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलनात समन्वयक व पैठण तालुक्यातील सकल मराठा समाजासह आठरा पगड जातीचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थीत होते.


उद्धव साहेब मराठ्यांना आरक्षण द्या नसता राजीनामा द्या....


प्रतिक्रिया -  

सरकारने तात्काळ मराठा आरक्षणाचा अद्यादेश काढुन मराठा युवकांना न्याय द्यावा.पोलीस भरती होत असल्यामुळे मराठा सामाजाचे विद्यार्थी त्यापासुन वंचित राहत आहे.त्यामुळे पोलीस भरतीसह सर्वच शासकीय नौकरभरतीला स्थगिती देण्यात यावी.
मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देत.प्रकरण घटनापिठाकडे वर्ग केले.या स्थितीमुळे मराठा समाजाच्या उमेदवारांना शिक्षण व नौकर्यांमध्ये आर्थिक - सामाजिक मागास प्रवर्गात आरक्षण मिळणार नसल्याने मराठा विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.सरकाने तात्काळ मराठा आरक्षणाचा अद्यादेश काढण्यात यावा.मुख्यमंञी उद्धव ठाकरे साहेब पदाचा राजीनामा द्या नसता मराठा समाजाला आरक्षण द्या आज संयमाने रास्तारोको आंदोलन केले यानंतर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतिने राज्यभर गणिमी काव्याने आंदोलन केले जाईल पुढील होणाऱ्या परिणामास केंद्र व राज्य सरकार जबाबदार असेल.

                    किरण काळे          पाटील.   
            समन्वयक,मराठा क्रांती ठोक मोर्चा

Post a comment

0 Comments