चंद्रकांत सुक्ते यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार


औरंगाबाद -
शिक्षक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती तर्फे राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार-2020 दि 05 सप्टेंबर रोजी शिक्षक सहकारी सोसायटी औरंगाबाद येथे पार पाडण्यात आला 
शैक्षणिक, राष्ट्रीय, सामाजिक कार्य तसेच कोविड 19 या आपत्तीजनक परिस्थितीत उल्लेखनीय कार्य करणारे श्री चंद्रकांत निवृत्ती सुक्ते (जि प प्रा शा हिराजी वस्ती डोंगरगाव शिव ता फुलंब्री) यांचा राज्य नेते श्री जयाजी भोसले साहेब यांच्या शुभ हस्ते राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
यापूर्वी त्यांना निर्वाण फाऊंडेशन नाशिक, आदर्श शिक्षक समिती औरंगाबाद, शालेय व्यवस्थापन हिराजी वस्ती तर्फे कोरोना योद्धा व उपक्रमशील शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला आहे 
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना च्या वैश्विक महामारीमुळे सोशल डिस्टंसिंग सह सर्व नियमांचे पालन करून छोटे ठिकाणी मोठा गौरव करण्यात आला
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष श्री दिलीपरावजी ढाकणे, प्रमुख पाहुणे संतोष ताठे , राज्य नेते जयाजी भोसले, जिल्हा नेते विष्णू गाडेकर, जिल्हा सरचिटणीस संतोष जाधव, कार्याध्यक्ष राजेश आचारी,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शाकीर सय्यद,सिल्लोड अध्यक्ष अनिल विचवे,महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा पुष्पा दौड, सुनंदा कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी चंद्रकांत सुक्ते यांना पुरस्कार मिळाल्याने श्री मच्छिंद्र शिंदे, संजय देव्हरे,चंदूलाल गवळे, दिलीप निकम, संजय चिकणे,शरद जाधव, अशोक गिरी,पंढरीनाथ ढेपले,योगेश बनसोड,नानासाहेब सावतर,विनोद साठे,सुरेश मान्टे,सतनाम राठोड, राहुल आळंदकर,प्रकाश देशमुख, गोकुळ इंगळे, प्रमोद हिवाळे, निलेश पाटे, संभाजी पाटील,अशोक सोनवणे, संतोष भाकरे,शिवाजी जगताप, मदन पाथरकर,दिपक करपे,रविंद्र खंडाळे, राजेंद्र जगताप,लक्ष्मीकांत कोलते, शंकर अग्रवाल, दत्तु पुरी,संजय हरणे, रोकडोबा डोईजड,बबनराव वाकुडे,गणेश घोगरे,प्रकाश हांडे,माधव हादवे,शिवाजी कंटक आदिंनी अभिनंदन करण्यात आले

Post a comment

0 Comments