महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्ष पदी सोमनाथ शिंदेपैठण ( प्रतिनिधी विजय खडसन):--- महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या पैठण तालुका अध्यक्षपदी सोमनाथ शिंदे  यांची निवड करण्यात आली आहे .
 प्रदेश अध्यक्ष वसंत मुंडे यांच्या प्रमुख उपस्थित जिल्हाध्यक्ष डॉ प्रभू गोरे यांनी नियुक्ती पत्र दिले आहे .  या निवडीबद्दल माजी आमदार संजय वाघचौरे , चेअरमन तुषार शिसोदे , नगराध्यक्ष सुरज लोळगे , क्रांतिसेना प्रदेश अध्यक्ष प्रा संतोष तांबे , मराठा महासंघाचे युवक प्रदेश अध्यक्ष अतिष गायकवाड , अ भा छावा जिल्हाध्यक्ष किशोर शिरवत  , छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत , मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर बावणे , माजी सभापती तथा आय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद तांबे , माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे , माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब पिसे  ,राजू बोंबले , प्रा संतोष गव्हाणे , केंद्रप्रमुख सुभाष शिंदे , मुख्याध्यापक शौकत पठाण , तालुका अध्यक्ष किशोर सदावर्ते , किशोर दसपुते 
यांच्यासह सह सर्व पत्रकार बांधवांनी अभिनंदन केले आहे .
------------------------------ - ---- -
 पत्रकारांच्या विविध समस्या आहेत . इतरांच्या समस्याला पत्रकार वाचा फोडतात . परंतु पत्रकारावर होणाऱ्या अन्यायासाठी कोणीही पुढे येत नाही . पत्रकारांवर अन्याय झाला तर कोणताही समाज रस्त्यावर येत नाही . त्यामुळे आपल्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना पूर्ण ताकदीने काम करत आहे . राज्य शासनाकडून पत्रकारांच्या समस्या सोडवून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना नक्कीच पत्रकारांना न्याय मिळवून देईल असे आश्वासन जिल्हाध्यक्ष डॉ प्रभू गोरे यांनी दिले .

Post a comment

0 Comments