खुलताबाद येथील वार्ड क्रमांक ९ मधील घर बळकवण्याचा पर्यत्न


औरंगाबाद ( प्रतिनिधी ) खुलताबाद येथील वार्ड क्रमांक ९ मधील अनेक वर्षा पासून पडीत अवस्थेत असलेलं वडिलोप्राजित घराची जागा काही लोकांना कडून अतिक्रम करून बळकवण्याचा पर्यत्न करण्यात येत आहे.या संदर्भात स्व.गोपाळ दसरथ पवार यांचे वारसदार असलेले गणेश पवार यांनी खुलताबाद येथील नगर परिषदच्या मुख्यअधिकारी यांना दिलेल्या अर्जात म्हटलं आहे की आजोबांच्या निधनानंतर आमचे कुटुंब उदरनिवार्हा करिता औरंगाबाद वाळुज भागात वास्तव्यास स्थालांतरीत झालेले आहे.गेल्या अनेक वर्षा पासून खुलताबादेतील घराची जागा तशीच पडीत अवस्थेत होती.मात्र या जागेवर काही जणांनी अतिक्रम केल्याची माहिती आमच्या कुटुंबाला मिळाली होती. गणेश पवार यांनी खुलताबाद येथील नगर परिषेद येथे जाऊन वार्ड क्रमांक ९ मधील घर क्रमांक ६५ घराबाबत खरेदी विक्रीस मानाई अर्ज देऊन सदरील जागेवर संबंधीतांन कडून झालेले अतिक्रम निकषीत करून आम्हाला आमची जागा मोकळी करून न्याय घावा तसेच सदरील घरा बाबत काही जणांन कडून बनावट कागदपत्र दाखवून खरेदी- विक्रीची करण्याची शक्यता नाकरता येत नाही.त्या मुळे.वार्ड क्रमांक ९ मधील घराच्या जागे बाबत आमच्या सहभागा शिवाय कोणताही खरेदी -विक्रीचा व्यवहार करू नये अशी मागणी करून विनंती वारसदार गणेश पवार यांनी केली.या संदर्भात गणेश पवार म्हणाले की एका गरीब कुटुंबाला हाताशी धरून कोणी तरी ही जागा बळकवण्याचा पर्यत्न करीत आहे.ते कुटुंब खरो खरच गरीब व प्रामाणीक असेल तर माणुसकीच्या भावनेतून त्यांना मुळीच बेघर होऊ देणार नाही.परंतू ती जागा आमच्या परिवाराची शेवटीची निशानी असल्यामुळे ती जागा आम्हाला सोडता येणार नाही.परंतू त्या गरिब कुटुंबाला शासन दरबारी योग्य ते पर्यत्न करून त्यांना घरकूल मिळवून देण्या करीता मी स्व:ता जातीने पर्यत्न करणार आहे.गरज पडली तर माझ्या कडून जी काही आर्थिक मदत करता येईल तीही मी करिल परंतू गरीब कुटुंबाला पुढे करून कोणी जर जागा बळकवण्याचा पर्यत्न करत असेल तर त्यांना योग्य त्या कायदेशीर मार्गाने उत्तर देण्यात येईल असेही शेवटी गणेश पवार म्हणाले .

Post a comment

0 Comments