कांदा निर्यात बंद उठवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिल्लोड ला उपजिल्हाधिकार्यांना निवेदनसिल्लोड ( प्रतिनिधी संजय दांडगे ) केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंद केल्यामुळे देशातील कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आल्यामुळे केंद्र सरकारने तात्काळ कांदा निर्यात चालू करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा यासाठी सिल्लोड तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सिल्लोड येथे उपविभागीय अधिकारी श्री.ब्रिजेश पाटील यांना विधानसभा अध्यक्ष दत्तात्रय पांढरे,तालुकाध्यक्ष अजित पाटील,शहराध्यक्ष शे.शाकेर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा संघटक तुकाराम कळम,जिल्हा उपाध्यक्ष राहुल सुरडकर ,जिल्हा सरचिटणीस इकबाल सर,वक्ता सेलचे जिल्हाध्यक्ष शिवा शेजूळ,युवक तालुकाध्यक्ष अनिल राऊत,युवक शहराध्यक्ष सचिन इंगळे, युवक जिल्हाउपाध्यक्ष पांडुरंग बडक ,किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष  हरिदास शेलार,तालुका उपाध्यक्ष अशोक लिंगायत,राजू डापके, बाळासाहेब तायडे,विनोद पगारे,रोहित नाटेकर,शे वासिम,शामराव गायकवाड,नजीर अहेमद इत्यादी कार्यकर्ते उपस्थित  होते .

Post a comment

0 Comments