गाडीचे हॉर्न का वाजवले म्हणून फिर्यादीच्या घरी जाऊन जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


पैठण ( प्रतिनिधी विजय खडसन)--- पैठण तालुक्यातील वडजी येथिल घटना .गाडीचे हॉर्न का वाजवले म्हणून फिर्यादीच्या घरी जाऊन जातीवाचक शिवीगाळ केल्या प्रकरणी पैठण तालुक्यातील पाचोड पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अंतर्गत वडजी ता पैठण येथील चार जना विरुद्ध गुन्हा शनिवारी दि 26 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 8 वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल झाला आहे.

 या घटने विषय सविस्तर माहिती अशी की,पैठण तालुक्यातील वडजी येथील रहिवासी श्रीनिवास वसंत झिने यांनी पाचोड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारित म्हंटले आहे की, मी टाटा सुमो चारचाकी वाहनचालक आहे. मी दि 24 सप्टेंबर रोजी गावातील बबन गोजारे यांना हृदयविकारचा झटका आल्याने त्यांना दवाखान्यात नेण्यासाठी त्यांच्या घरी जात असताना रस्त्यावर गप्पा मारत उभे असलेले तुळशीराम एकनाथ भांड व लक्ष्मण भांड याना रस्त्यावरून बाजूला सरकण्यासाठी गाडीचे हॉर्न वाजवले मात्र ते रस्त्यावरुन बाजूला न झाल्याने पुन्हा हॉर्न वाजवले असता ते म्हणाले आम्हाला ऐकू आलं आहे असं म्हणत पुन्हा त्यांनी माझ्या गाडीचे हॉर्न वाजून घेतलं त्यानंतर मी बबन गोजारे यांना पाचोड येथील चावरे हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते.

 मात्र शनिवारी दि.26 सप्टेंबर रोजी सकळी 7 वाजेच्या सुमारे तुळशीराम भांड हा माझ्या घरी येऊन मला म्हणायला
त्या दिवशी तू लय बोलत होता असे म्हणत शिवीगाळ करू लागला तेव्हा त्याचा भाऊ गुलाब भांड यांनी त्याला समजून सांगत घरी कडून दिले मात्र पुन्हा सोमनाथ लक्षण भांड, तुळशीराम एकनाथ भांड,पवन नारायण भांड, अशोक काकासाहेब भांड सर्व रा वडजी ता पैठण हे माझ्या घरी काठ्या घेऊन आले तेव्हा या चोघानी संगनमत करत तू परवा लई मजला होता का ? आम्हांला पाहून गाडीचे हॉर्न वाजवतो का असे म्हणत गावात व सार्वजनिक ठिकाणी समाजामध्ये अपमानास्पद शब्द मध्ये जाती वाचक शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत नमुद केल्यावरून अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा अंतर्गत सोमनाथ लक्षण भांड, तुळशीराम एकनाथ भांड,पवन नारायण भांड, अशोक काकासाहेब भांड सर्व रा. वडजी ता .पैठण या चार जना विरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी जगन्नाथ उबाळे,हनुमान धन्वे तपास करीत आहेत.

Post a comment

0 Comments