माझे कुटुंब माझी जबाबदारी" मोहीम यशस्वी पने राबविणार - डॉ प्रसन्न भाले

"

फुलंब्री (प्रतिनिधी गजानन इधाटे)


 दि. १५/०९/२०२० फुलंब्री तालुक्यांमध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी हा महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रम चालू होत आहे, यामुळे अंतर्गत आपल्या तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्र द्वारे एकूण 114 टीम कार्यरत राहणार असून त्या अंतर्गत एकूण 342 कर्मचारी मोहीमेमध्ये काम करणार असून त्या मोहिमेचे पर्यवेक्षण तालुक्यातील 10 वैद्यकीय अधिकारी, 10 पर्यवेक्षक करणार आहेत या मोहिमेअंतर्गत तालुक्यात प्रत्येक घरामध्ये जाऊन कुटुंबातील सर्व सदस्यांची प्राथमिक तपासणी केली जाणार आहे सदर तपासणी अंतर्गत संशयित आढळून आलेले व्यक्तींना संदर्भित  केली जाणार आहे.
माननीय आरोग्य मंत्री व आरोग्य मंत्रालय यांच्या "चेस द  व्हायरस" संकल्पनेतून या मोहिमेची  निर्मिती झालेली आहे.
 सदर मोहीम शंभर टक्के यशस्वी  करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असे तालुका आरोग्य अधिकारी, डॉ. प्रसन्ना भाले यांनी सांगितले.

तसेच या मोहिमेसाठी तालुक्यातील सर्व नागरिकांनी सहकार्य करून ही मोहीम यशस्वी होण्यास मदत करावी. जर काही आरोग्य विषयक त्रास असेल तर सर्वे साठी येणार्‍या आरोग्य कर्मचारी यांना स्वतः पुढे येवून, न भिता सांगणे असे आवाहन मा. तहसीलदार फुलंब्री, मा. गट विकास अधिकारी पं. स. फुलंब्री, तालुका आरोग्य अधिकारी फुलंब्री, वैद्यकीय अधीक्षक तसेच सर्व वैद्यकीय अधिकारी यांनी केले आहे.

Post a comment

0 Comments