वैजापुरात बि जे एस हेल्मेट मार्फत नागरिकांची थर्मल स्क्रिनिंगवैजापूर(प्रतिनिधी/राहुल त्रिभुवन) :


सदैव संकटकाळी मदतीचा हात देऊन समाजकार्यात पुढे राहणाऱ्या भारतीय जैन संघटनेने वाढत्या कोरोना संक्रमणाला रोखण्यासाठी रूपये पंच्चावन्न लाख कीमतीचे स्मार्ट हेल्मेट वैजापूर सारख्या शहरात एका दिवसासाठी आणुन त्याद्वारे नागरिक व व्यापाऱ्यांची अत्याधुनिक पध्दतीने स्मार्ट हेल्मेट थर्मल स्क्रीनिंग करण्यात आली. भारतीय जैन संघटना , वैजापूर नगर परिषद व उपजिल्हा रुग्णालय  वैजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या या अनोख्या उपक्रमाचे उद्घाटन वैजापूर तालुक्याचे आमदार रमेश बोरनारे  , नगराध्यक्ष सौ. शिल्पाताई परदेशी , मा.नगराध्यक्ष रविंद्र संचेती , तहसीलदार निखिल धुळधर , मुख्याधिकारी बी.यु.बिघोत , वर्धमान ना.सह.पत.चे चेअरमन हेमंत संचेती , वैजापूर तालुका किराणा व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष प्रकाशचंद बोथरा , मर्चंट बैंकेचे चेअरमन विशाल संचेती , भारतीय जैन संघटनेचे मराठवाडा सचिव निलेश पारख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अशोक धसे  यांनी प्रास्ताविक केले व स्मार्ट हेल्मेट प्रकल्प प्रमुख प्रकाश कोचेटा यांनी हेल्मेट थर्मल स्क्रीनिंग बाबत माहिती दिली व अशोक कोठारी , राजेश संचेती , प्रफुल संचेती , महेश हिरण , रूपेश कुचेरीया , कीरण सारडा , संजय मालपाणी , अनिल संचेती , जितेंद्र संचेती व सहकाऱ्यांनी
कोरोना महामारीच्या सहा महिन्यांच्या कालावधीत भारतीय जैन संघटनेतर्फे रक्तदान शिबिर , कीराणा साहित्य व भाजीपाला वाटप , डॉक्टर आपल्या दारी द्वारे नागरिकांची मोफत तपासणी व मोफत औषधोपचार , परप्रांतीय नागरिकांची रहाण्याची खाण्यापिण्याची व जाण्याची व्यवस्था , कोरोना तपासणीसाठी सहकार्य , मास्क व सॅनिटायजर वाटप , प्लाझ्मा डोनेशन संमतीपञ आदी राबविलेल्या विविध आरोग्यसेवा व कार्याचे कौतुक केले. यावेळी डॉक्टर आपल्या दारी द्वारे मोफत रूग्ण तपासणी व औषधोपचारासाठी सहकार्य करणाऱ्या डॉक्टर व सहकाऱ्यांचा कोरोना योद्धा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. 
सर्व  नगरसेवक ,सदस्य , नगर परिषद , तहसील व पंचायत समिति कर्मचारी , नागरिक व व्यापारी बांधव , विविध बॅक व पतसंस्थांचे कर्मचारी यांच्या तपासणीतुन वैजापूर शहरामध्ये सर्व अनलॉक झाल्यामुळे वाढत जाणाऱ्या कोरोना संसर्गला आळा घालण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला. ज्यात वैजापूर शहरामध्ये गर्दीच्या ठिकाणी BJS स्मार्ट हेल्मेट च्या माध्यमातून 5980 नागरिकांची शारिरीक तपासणी करण्यात येऊन उच्च तापमान असलेल्या 86 नागरिकांना त्यांची पुढील चाचणी करुन होणारा संसर्ग रोखण्यासाठी व परिवार व परिसराला सुरक्षित ठेवण्यासाठी मदत होईल.

Post a comment

0 Comments