महसूल कर्मचाऱ्यांकडून गुरुवारी मराठवाड्यात एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन

सिल्लोड, नायब तहसीलदार तसेच तहसीलदार पदोन्नती नवीन सुधारीत शासन निर्णयानुसार देण्यात यावी या मागणीसाठी महसूल कर्मचाऱ्यांकडून गुरुवारी मराठवाड्यात एक दिवस;ीय सामूहिक रजा आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला सिल्लोड तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पाठिंबा देत एक दिवसीय सामूहिक रजा व पाठिंब्याचे पत्र नायब तहसीलदार किरण कुलकर्णी यांच्याकडे बुधवारी दिले.

   अव्वल कारकुन संवर्गातून नायब तहसीलदार तसेच नायब तहसीलदार संवर्गातून तहसीलदार संवर्गात पदोन्नती देण्यात यावी. तसेच या संधर्भातील कर्मचारी, अधिकारी यांच्या विरुध्द सुरु असलेले विभागीय चौकशी फोसदारी प्रकरणे निर्णयाच्या आधीन राहून त्यांना पदोन्नती नवीन सुधारीत शासन निर्णयानुसार तत्काळ निर्गमित करावे. शिवाय अव्वल कारकुन, मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती आदेश निर्गमित करावे अशा मागण्यांसाठी महसूल कर्मचारी एक दिवसीय सामूहिक रजा आंदोलन करीत आहेत.

  या आंदोलनाला कार्यालयातील पेशकर आशिष औटी, स्वाती म्हळसने, विजय चव्हाण, बी. डी. शिसोदे, असद उल्ला, विलास व्यवहारे आदिंनी पाठिंबा देत एक दिवसीय सामूहिक रजा दिली आहे. 

Post a comment

0 Comments