खुलताबाद येथे शिवाजी गायकवाड यांचा सत्कार.


खुलताबाद - तालुक्यात
 आमदार  प्रशांत भाऊ बंब यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील  बूथचे 100 टक्के व्हाट्स अँप ग्रुप  तयार केल्याबद्दल, तालुका सरचिटणीस, तसेच तालुका व्हाट्स अँप सयोंजक श्री शिवाजी गायकवाड यांचा सत्कार जिल्हा उपाध्यक्ष श्री संजय भाऊ खंबायते यांच्या हस्ते करण्यात आला.
      प्रदेश अध्यक्ष,जिल्हा अध्यक्ष, यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील प्रत्येक गावात व गावातील बूथवर शासनाच्या विविध योजनांची माहिती जनसामान्य व्यक्तीपर्यंत पोहचावी याकरिता प्रत्येक बूथचा व्हाट्स अँप ग्रुप तयार करावे , असं भारतीय जनता पक्षाने ठरवलं होते.
     पक्षाचा आदेश समजून , आमदार प्रशांत बबं यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका सरचिटणीस तसेच तालुका व्हाट्स अँप सयोंजक श्री शिवाजी गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तालुक्यातील 95 बूथचे व्हॉट्स अँप ग्रुप तयार करण्यात आले, तालुक्यातील सर्व बूथचे ग्रुप तयार करतांना तालुक्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ प्रमुख, यांचे या कामात मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी
 भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रकाश वाकळे, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष राहुल निकुंभ, पंचायत समितीचे सभापती गणेश नाना  अधाने, माजी उपसभापती दिनेश अंभोरे पंचायत समिती सदस्य युवराज ठेंगडे, शहराध्यक्ष सतिश दांडेकर,माजी नगरसेवक आशिष कुलकर्णी, उपसभापती प्रकाश चव्हाण, तालुका सरचिटणीस  अविनाश कुलकर्णी  , राजू ठेंगडे, नगरसेवक योगेश बारगळ, परसराम बारगळ, संदीप निकम, गोकुळ ग्रॅण्डवाल सुनिल पवार बाबासाहेब वाकळे , पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Post a comment

0 Comments