मळद ग्रामस्थांनी आमदार कुल व PWD उपअभियंता यांचे मानले आभार...


निलेश जांबले

 दौंड-पुणे

 अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न लावला मार्गी
   मळद येथील पुणे सोलापूर महामार्ग व रेल्वे स्टेशन दरम्यानच्या रस्त्याच्या मुरमी करणाच्या  कामास आमदार  राहुल कुल यांच्या आमदार फंडातून  3 लाख रुपये  तरतूद करण्यात आली होती. तसेच या कामाचे टेंडर ही झाले होते. 
सदरचा रस्ता हा भोळबावाडी, कौठडी, मळद शेलार वस्ती, तसेच मळद ग्रामस्थांनी च्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून  या रस्त्याचा वापर मळद रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांच्या दृष्टीने देखील अतिशय महत्त्वाचा आहे. सन 1965 पासून हा रस्ता अस्तित्वात असून नकाशामध्ये या रस्त्याची नोंद आहे. या रस्त्याच्या कामात आजूबाजूचे शेतकरी अडथळा निर्माण करत होते. मात्र याबाबत अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि संबंधित शेतकऱ्यांशी चर्चा ही झाली होती. मात्र तरीही ते शेतकरी रस्ता करण्यासाठी मज्जाव करत होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता हरिश्चंद्र माळशिकारे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह ह्या रस्त्याचे काम पुर्ण करुन घेतले त्यामुळे अनेक ग्रामस्थांना हा रस्ता उपयोगी पडणार असल्याने मळद येथील ग्रामस्थांनी आमदार राहुल कुल यांना निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार पत्र व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता हरिश्चंद्र माळशिकारे यांना ही आभार पत्र देवुन त्यांचा सत्कार करण्यात आला.
  नागरिकांची सोय झाल्याने नागरिकांनी  सत्कार केल्याने  या सत्कारा नंतर उप अभियंता माळशिकारे यांना गहिवरून आले. 
  दरम्यान तालुक्यात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असताना मळद येथील या रस्त्याचे काम पुर्ण केल्याबद्दल आमदार कुल व उप अभियंता यांचे आभार मानण्याची ही पहिलीच वेळ आहे.

विकासकामांना राजकीय वळण देवून अनेकदा जाणीवपूर्वक अडथळे निर्माण होतात परंतु अधिकारी वर्ग सक्षम असेल तर विकासकामांना गती मिळू शकते अशी सर्वसामान्य जनतेची यामुळे भावना झाली आहे. या कार्यक्षम अधिकाऱ्यांचे सर्वच स्थरातून कौतुक व अभिनंदन होत आहे. दौंडचे आमदार राहुल दादा कुल यांनी याकामी विशेष लक्ष दिले. तसेच सरकारी अधिकाऱ्यांच्या या सत्कारामुळे शासकीय अधिकारी वर्ग देखील आचंबित झाला आहे.

Post a comment

0 Comments