'मी सुशांतला ड्रग्ज घेताना पाहीलंय', दीपेश सावंतचा NCB कडे खुलासा

 
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी अटकसत्र सुरु झालंय. एनसीबी ड्रग्ज कनेक्शनची चौकशी करत आहे. याप्रकरणी सुशांचा नोकर दीपेश सावंतला अटक करण्यात आलीय. दीपेशला सरकारी पुरावा म्हणून कोर्टात सादर करण्यात येणार आहे. दीपेशने एनसीबीकडे केलेली विधानं 'झी न्यूज'च्या हाती लागली आहेत. 

सप्टेंबर २०१८ मध्ये मी सुशांतच्या संपर्कात आलो आणि त्याच्या सांगण्यावरुन सोबत राहू लागलो. दोन-तीन दिवसातच तो ड्रग्ज घेत असल्याचे माझ्या लक्षात आल्याचे दीपेशने एनसीबीला सांगितले. आपण कधीच ड्रग्ज आणून दिले नसल्याचे दीपेशने सांगितले. मला मोफत काम करायला सांगितले आणि नंतर काढून टाकण्यात आलं. त्यानंर जानेवारी २०२० मध्ये सुशांतचा फोन आला. सुशांत अभिनय सोडून लोणावण्याला शिफ्ट व्हायच्या विचारात होता. मी पुन्हा काम कराव अशी त्याची इच्छा होती असेही दीपेशने एनसीबीला सांगितले. सुशांतने आपल्या कुकच्या फोनवरुन कॉल केला होता. 

आपलं शिक्षण झाल्यानंतर मी खेळण्यांच्या दुकानात काम केलं. त्यानंतर बिंदास्त चॅनलसाठी लाईफ लफ्डे बंदियामध्ये इंटर्न असिस्टंट दिग्दर्शक म्हणून काम सुरु केलं. अंजान हा शो वडील उत्तम सावंतांच्या निधनानंतर सोडावा लागला. त्यानंतर काही महिने घरी होतो. सप्टेंबर २०१८ मध्ये ओळखीच्या रुषीकेश पवारच्या ओळखीतून सुशांतच्या संपर्कात आल्याचे दीपेशने एनसीबीला सांगितले.

Post a comment

0 Comments