प्रभाग क्रमांक 10,व 11 मधील जलकुंभ अन्य ठिकाणी हालू देणार नाही -हासनोद्दिन कट्यारे


पैठण प्रतिनिधी विजय खडसन :------ पैठण शहरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरनाच्या मार्फत १० व ११ या प्रभागात दोन पाण्याचे जलकुंभ मंजूर केले असून दोन्ही जलकुंभाचे काम सुरू होत नसल्याने हासनोद्दिन कट्यारे यांच्या नेतृत्वात सर्व पक्षीय नगर सेवक यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभाग क्र.१औरंगाबाद यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली होती. त्याला उत्तर देत दि.१२.१०.२०२० च्या पत्रांनुसार खुलासा सादर केला आहे.
प्रभाग ११ मध्ये नवनाथ मंदिर जलकुंभ ४.९० लक्ष लिटर च्या कामासाठी एकवर्षांपूर्वी खोदकाम सुरू केले होते परंतु स्थानिक नागरिकांकडून नवनाथ मंदिराला व भाविकांना अडचण निर्माण होऊ शकते हे कारण दाखवत व जागे विषयी श्री.अल्ताफ जफर जहागीरदार रा.पैठण यांनीही जलकुंभाचे काम बंद पाडले आहे. 
तर प्रभाग १० मधील ७.७० लक्ष लिटर पाण्याच्या क्षमतेच्या जलकुंभ तयार करण्यापूर्वी बायपास व्यवस्था करण्यासाठी चाचणी घेण्यात आली परंतु जुनी पाईप लाइन ही ३५ वर्ष जुनी आहे. व त्या भागतील जमीन पातळीत ३ ते ४ मीटरचा फरक असल्याने बायपास द्वारे उंच भागात पाणी पोहोचू शकत नाही असे नमूद केले आहे. जुना जलकुंभ पाडण्यासाठी पुरेशी जागा नसल्याचेही कारण जीवन प्राधिकरनाने सांगितले आहे. या साठी प्राधिकरणाने नगर परिषदे कडे अन्य ठिकाणची जागा मागविल्याचे सांगितले आहे. 
------------------------------------------------------------------------
परंतु हा जलकुंभ उच्च भ्रू वस्तीत पळवण्याचा डाव असल्याने ह्या अडचणी सांगण्यात येत आहे. आराखडा तयार करताना ह्या गोष्टी नप च्या लक्षात का आल्या नाहीत जाणून बुजून हा जलकुंभ अन्य ठिकाणी पाळावयाचे असल्याने ह्या अडचणी सांगण्यात येत आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने प्रभाग क्रमांक १० व ११ चे जलकुंभ नियोजित ठिकाणीच करावेत अन्यथा जीवन प्राधिकरण औरंगाबाद कार्यालया समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा हासनोद्दीन कट्यारे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. 

-------------------------------------------------------------------

Post a comment

0 Comments