भिकारी महिलेच्या झोपडीत 10 महागडे मोबाईल, पोलीसही अवाक

वसई-विरार : दररोज भीक मागून गुजराण करणाऱ्या भिकाऱ्यांबाबत त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे आढळल्याचं तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. मात्र, वसई-विरारमध्ये एका भिकारी महिलेकडे तब्बल १० ब्रँडेड कंपनीचे महागडे फोन आढळले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांसह कारवाई करणारे पोलीसही अवाक झाले आहेत. आरोपी भिकारी महिलेच्या अगदी साध्या झोपडीत हे फोन आढळले आहेत. विरार पोलिसांनी या महिलेवर कारवाई केली.

विरारमध्ये भिकारी महिलेच्या झोपडीत चक्क विविध ब्रँडेड कंपनीचे १० महागडे मोबाईल फोन सापडले आहेत. यामुळेच एकच खळबळ उडाली आहे. विरार पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी भिकारी महिलेची झडती घेतली. यावेळी या महिलेकडील महागड्या मोबाईलचं घबाडच पोलिसांच्या हाताला लागलं आहे. विनोदबाई आजागृ सोलंकी असं या भिकारी महिलेचं नाव आहे. या ४० वर्षांच्या भिकारी महिलेकडे इतके मोबाईल आढळल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

Post a comment

0 Comments