औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 137 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर सहा जणांचा मृत्यूऔरंगाबाद, :  औरंगाबाद जिल्ह्यात आज 301 जणांना (मनपा 226 ग्रामीण 75) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 30263 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 137 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 34982 झाली आहे. आजपर्यंत एकूण 983 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3736 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 59 आणि ग्रामीण भागात 20 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण (52)
गारज वैजापूर (1),   सिल्लोड (1), ताडपिंप्री, कन्नड(1), बजाजनगर (3),  सिडको महानगर (4),पंढरपूर (1), गोसळे सोयगाव (1),  देवली लासूर स्टेशन (4),  देगाव रोड लासूर स्टेशन (1),  वैजापूर(1),  आनंदपुर, पैठण (11),  शांती नगर (1),  करमाड (1),  जामगाव, गंगापूर(1),  औरंगाबाद (7), गंगापूर (5), कन्नड (2), सिल्लोड (3), वैजापूर (2),   पैठण (1)

मनपा (26)
एन  2 मायानगर सिडको (1),   विजयनगर (1),   प्रथमेश नगर बीड बाय पास (1),   जैन सेंटर सिडको (1),   टाऊन सेंटर (1),   सारावैभव हर्सुल (1),   विष्णू नगर सिडको (1),   सातारा परिसर (1),   शेंद्रा एमआयडीसी (1), कांचनवाडी (1),   उस्मानपुरा (1),   सुपारी हनुमान मंदीर परिसर (1),   वेदांत नगर (1),   नक्षत्रवाडी (1),   सुधाकर नगर (1),   त्रिवेणी नगर (1),   श्रीकृष्ण नगर (1),   राम नगर (2),  सारा वैभव जटवाडा रोड (1), देवगिरी कॉलनी, जवळ क्रांती चौक पोलीस स्टेशन परिसर (1), अरिहंत नगर (2),  न्यू बालाजी नगर (1),   बन्सीलाल नगर (1), पदमपुरा  (1)   

     सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू
        घाटीत कन्नड तालुक्यातील माळीवाडा येथील 75 वर्षीय पुरुष , खाराकुवा येथील 79 वर्षीय पुरुष, नेवपूर जहांगीर, चिंचोली लिंबाजी येथील 42 वर्षीय पुरुष, एन सात सिडकोतील 65 वर्षीय स्त्री, खुलताबाद येथील 83 वर्षीय पुरूष्‍ आणि खासगी रुग्णालयात शेंद्रा कामगार चौकातील 59 वर्षीय पुरुष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

*****

Post a comment

0 Comments