कुत्र्याला वाचवणं जिवावर बेतलं, 17 वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू, कुटुंबियांवर अवकळा

सोलापूर : रस्त्यावर कुत्रा आडवा आल्याने १७ वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना माढा येथे घडली असून कुत्र्य़ाला वाचवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाला. संग्राम कदम असे मृत मुलाचे नाव आहे. तो नुकतीच दहावी वर्गाची परीक्षा उत्तीर्ण झाला होता. 

मिळालेल्या माहितीनुसार संग्राम आपल्या घरासमोर लावलेला ट्रॅक्टर शेताकडे घेऊन जात होता. ट्रॅक्टर चालवत असताना अचानाक कुत्रा समोर अल्याने तो गोंधळला. समोर आलेल्या कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला.

Post a comment

0 Comments