औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 175 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर , सात जणांचा मृत्यू

औरंगाबाद, :  औरंगाबाद जिल्ह्यात आज 332 जणांना (मनपा 216, ग्रामीण 116) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 29659 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण  175 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 34725 झाली आहे.  आजपर्यंत एकूण 975 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4091 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 56 आणि ग्रामीण भागात 30 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण (76)
शिळेगाव, गंगापूर (1), तीसगाव (2), पालखेड, बोरसर (4), गोलवाडी (2), बजाज नगर (1), इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर (1), सारा संगम, बजाज नगर (1), छत्रपती नगर, बजाज नगर (1), देवगिरी नगर, बजाज नगर (1),  बजाज नगर (1), देवगाव, कन्नड (1), तालपिंपळगाव, कन्नड (1), खांडसरी परिसर, कन्नड (1), हसनाबादवाडी (3), सायगाव, पैठण (1), आनंदपूर, पैठण (1), नरसापूर, गंगापूर (1), धानोरा, गंगापूर (1), देवळी, गंगापूर (6), भोयगाव, गंगापूर (1), पानवडोद, सिल्लोड (1), भवन, सिल्लोड (2), स्टेशन रोड, वैजापूर (1), मारवाडी गल्ली, वैजापूर (1), शांती नगर, कन्नड (1), भीलपलटन, कन्नड (2), लासूर गंगापूर (2), धामणगाव, फुलंब्री (1), भराडी (1),  गोपीवाडा, पैठण (1), आंबेगाव, गंगापूर (1), औरंगाबाद (1), फुलंब्री (6), गंगापूर (3), कन्नड (8), खुलताबाद (6), पैठण (5), सोयगाव (1)   

मनपा (43)
शिवशक्ती कॉलनी (1), एन दोन सिडको (1), राधास्वामी कॉलनी (1), अन्य (2), राम नगर (2), गारखेडा (1), पिसादेवी रोड (1), जय भवानी नगर (2), एन सात (1), साई हॉस्पीटल जवळ, समर्थ नगर (2), जवाहर कॉलनी (1), एन पाच सिडको (1), हनुमान नगर (2), उल्कानगरी (4), वसंत नगर (1), मेहेर नगर (1), एसआरपीएफ कॅम्प परिसर (1), एन तेरा हडको (1), सिद्धेश्वर नगर, जाधववाडी (1), एन सात सिडको (1), भावसिंगपुरा (2), बीड बायपास रोड (1), भवानी नगर (1), एन तीन सिडको (2), खाराकुंवा (1) घाटी परिसर  (1), राजे संभाजी कॉलनी (2), गजानन नगर (1), खडकेश्वर (1), एमजीएम हॉस्पीटल परिसर (1), कुंभारवाडा, एन दोन (1), बालाजी नगर (1), 

सात कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत कन्नड येथील 30 वर्षीय पुरूष, शहरातील वानखेडे नगरातील 70 वर्षीय पुरूष, खुलताबाद तालुक्यातील सोबलगावातील 72 वर्षीय पुरूष, कन्नड तालुक्यातील देभेगावातील 70 वर्षीय स्त्री, शहरातील मुकुंदवाडीतील 55 वर्षीय स्त्री, क्रांती चौकातील 52 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयातील 62 वर्षीय स्त्री कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Post a comment

0 Comments