मोदींची सत्तेतील 19 वर्ष पूर्ण

नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा इतिहास रचला आहे.  नरेंद्र मोदी यांनी आज राज्य आणि त्यानंतर केंद्र सरकारच्या प्रमुखपदी राहून १९ वर्षे पूर्ण केली आहेत. नरेंद्र मोदी जवळपास १४ वर्षे गुजरातचे मुख्यमंत्री होते आणि आता ६ वर्षे देशाचे पंतप्रधान या पदावर आहेत. 
यानिमित्ताने भारतीय जनता पक्ष उत्सव साजरा करत असून, सर्वच स्तरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. नरेंद्र मोदी यांनी ७ ऑक्टोबर २००१ ला गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळला आणि २२ मे २०१४ पर्यंत हे मुख्यमंत्रिपदी होते. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ ला पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि तेव्हापासून आजतागायत ते पंतप्रधानपदावर कायम आहेत.

Post a comment

0 Comments