औरंगाबाद जिल्ह्यात आज एकूण 193 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर सहा जणांचा मृत्यू


औरंगाबाद,  :  औरंगाबाद जिल्ह्यात आज 404 जणांना (मनपा 264, ग्रामीण 140) सुटी  देण्यात आली. आजपर्यंत 29082 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण  193 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 34386 झाली आहे.  आजपर्यंत एकूण 958 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4346 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 52 आणि ग्रामीण भागात 19 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (81)
एन आठ (3), शिवशंकर कॉलनी (1), श्रेय नगर (1), विजय नगर, मुकुंदवाडी (1), नारळीबाग (1), मिलिट्री हॉस्पीटल (5), एन दोन, ठाकरे नगर (3), सूतगिरणी चौक (1), भगतसिंग नगर (2), बन्सीलाल नगर (2), साई प्लाजा (1), न्यू विशाल नगर (1), एन सहा परिसर (4), शिवाजी नगर (3), एमआयडीसी चिकलठाणा (1), एन चार सिडको (3), जवाहर कॉलनी (1), गारखेडा परिसर (1), दीप नगर, दर्गा रोड (4), पद्मपुरा (2), मिनाताई ठाकरे नगर, सातारा परिसर (3), प्रताप नगर (2), बजाज नगर (4), एन सात सिडको (1), वेदांत नगर (1), देवगिरी कॉलनी मिटमिटा (1), उस्मानपुरा (1), नागेश्वरवाडी (1), अजब नगर (1), एन अकरा सिडको (1), एकदंत नगर (1), जे सेक्टर मुकुंदवाडी (1), दिशा अलंकार, सिडको (1), अहिंसा नगर, आकाशवाणी (1), उल्कानगरी (2), कैलास नगर, आकाशवाणी परिसर (1), राजा बाजार (1), स्वामी विवेकानंद नगर (2), कांचनवाडी (1), मयूर पार्क परिसर (1), गजानन नगर (1), मयूरबन कॉलनी (1), बीड बायपास परिसर (2), सुदर्शन नगर (1), हनुमान नगर (1), व्यंकटेश नगर (1), पडेगाव (1), गुरू लॉन्स, बीड बायपास (1), जय भवानी नगर (2), नारेगाव (1),

ग्रामीण (60)
पारनेर, सिल्लोड (1), मोंढा, सिल्लोड (2), सोबलगाव, खुलताबाद (1), सिडको महानगर, बजाज नगर (1), राधास्वामी नगर, वाळूज (1), बजाज नगर (1), चिंचबन कॉलनी, जय भवानी चौक (1), ग्रोथ सेंटर, सिडको महानगर (1), गुरूदत्त कॉलनी, नरसिंगपूर, कन्नड (1), करमाड (2), जैन स्पाइनर, पैठण (1), गोपेवाडी, पैठण (1), यशवंत नगर, पैठण (1), वाघाडी, पैठण (1), एसबीआय पैठण (4), सिल्लोड रोड, फुलंब्री (1), समता नगर, गंगापूर (2), गंगापूर (1), नरसापूर (1), जयसिंग नगर, गंगापूर (1), स्नेह नगर, सिल्लोड (4), श्रीकृष्ण कॉलनी, सिल्लोड (2), भवन सिल्लोड (2), जय भवानी नगर, सिल्लोड (1), दहेगाव, वैजापूर (1), कारंजगाव, वैजापूर (1), मारवाडी गल्ली वैजापूर (1), वडगाव कोल्हाटी (1), बाजारसावंगी (1), औरंगाबाद (7), गंगापूर (1), कन्नड (4), वैजापूर (7), सोयगाव (1),

सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत कन्नड तालुक्यातील चापानेर येथील 70 वर्षीय पुरूष, वैजापूर तालुक्यातील गाढेपिंपळगावातील 90 वर्षीय स्त्री, तिसगावमधील म्हाडा कॉलनीतील 80 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयांत छावणीतील 69 वर्षीय पुरूष, टीव्ही सेंटरमधील 73 वर्षीय पुरूष, सिल्लोड तालुक्यातील स्नेह नगरातील 42 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
*******

Post a comment

0 Comments