2 किमी अनवाणी, मात्र खासदार आणि आमदार राणा दाम्पत्याला मंदिरात प्रवेश नाहीच.

अमरावतीः खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा दाम्पत्याला अंबादेवी मंदिरात प्रवेश नाकारण्यात आला आहे. राणा दाम्पत्य कार्यकर्त्यांसह दोन किलोमीटर अनवाणी पायी चालत अमरावतीच्या प्रसिद्ध अंबादेवीकडे पोहोचले असता त्यांना मंदिरात आतमध्ये प्रवेश नाकारण्यात आला. खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांनी मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना आतमध्ये दर्शनासाठी जाण्यास मज्जाव करण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरं बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे राणा दाम्पत्याला प्रवेश दिला गेला नाही. राणा दाम्पत्याने मंदिराबाहेर राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी करत बाहेरून देवीची ओटी भरत पूजा केली, राणा दाम्पत्य हे दरवर्षी दोन किलोमीटर अनवाणी पायी अंबादेवी मंदिरात दर्शनासाठी जात असतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही कार्यकर्त्यांसह राणा दाम्पत्य मंदिरात दर्शनासाठी गेले असता त्यांना बाहेरच अडवण्यात आले, त्यामुळे त्यांनी बाहेरूनच अंबादेवीचं दर्शन घेतले. मात्र त्यांनी राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली तर राज्यातील दारूची दुकान सुरू आहेत, मंदिर मात्र बंद आहेत, त्यामुळे मंदिर सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

Post a comment

0 Comments