"झी 24 तास महाराष्ट्राची शान" या कार्यक्रमामध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस नाईक/221 प्रसाद मनोहर औटी यांचा गौरव:

प्रतिनिधी:
जगभारात पसरलेल्या कोव्हिड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता दि. २२/०३/२०२० पासून
महाराष्ट्रामध्ये लॉक-डाऊन घोषित करण्यात आले, त्याचप्रमाणे सर्व धार्मिक स्थळे नित्योपचार सुरू ठेऊन
भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आली. दरम्यान यावर्षीची आषाढीवारीही भरविली जाणार नाही व
कोणीही भाविक भक्तांनी पंढरपूरच्या दिशेने येऊ नये असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले.
त्याकरिता पोलीस प्रशासनाच्यावतीने पंढरपूर शहराच्या चोहोबाजूने येणाऱ्या मार्गावर तिहेरी नाकाबंदी
लावण्यात आली.
वरील प्रमाणे लावण्यात आलेल्या नाकाबंदीच्या अनुषंगाने पंढरपूर शहर पोलीस ठाणे कडील पोलीस
नाईक/२२१ प्रसाद मनोहर औटी यांच्या संकल्पनेतून पंढरपूरकडे चालत येणाऱ्या भाविक भक्तांना
पंढरपूरकडे येण्यापासून परावृत्त करणेकरिता त्यांना समजेल अशा पध्दतीने व्हीडीओ क्लीप तयार करून
सोशल मिडीयाचा अत्यंत चांगल्या प्रकारे जनहिताकरिता उपयोग करून सदरची व्हीडीओ क्लीप संपुर्ण
महाराष्ट्र तसेच शेजारील राज्यात प्रसारित करून जनमानसात प्रबोधन करून भाविक भक्तांना पंढरपूरकडे
येण्यापासून प्ररावृत्त केले. त्यामुळे कोव्हिड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता मोठ्या प्रमाणावर यश
मिळालेले आहे.
त्याबाबत यापूर्वी मा. पालकमंत्री महोदय, तसेच वरीष्ठ पोलीस अधिकारी यांनी प्रसाद औटी यांचे
कौतूक केलेच होते, तरीही त्यांच्या ह्या सामाजिक कार्याची दखल घेऊन “ झी २४ तास महाराष्ट्राची शान"
या कार्यक्रमामध्ये सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस नाईक / २२१ प्रसाद मनोहर औटी यांचा गौरव
करण्यात आला आहे.
तसेच प्रभारी पोलीस अधीक्षक श्री.अतुल झेंडे साो. पोलीस उपअधीक्षक ( मुख्यालय ) श्री.अरूण
सावंत व इतर सर्व पोलीस / अधिकारी कर्मचारी यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

Post a comment

0 Comments