कर्करोगाचा उपचार करणे सोपे होणार, 300 वर्षांत पहिल्यांदाच मानवी शरीरात नव्या ग्रंथींचा शोध

मुंबई : नेदरलँड्समधील वैज्ञानिकांनी प्रोटेस्ट कर्करोगाच्या संशोधनादरम्यान, घशातील नवीन लाळ ग्रंथींचा (Salivary Glands) शोध लावला आहे. ३०० वर्षात प्रथमच मानवी शरीरात  ही नवीन ग्रंथी आढळल्याचा दावा केला जात आहे. यामुळे कर्करोगाच्या उपचारांदरम्यान बराच फायदा होईल, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. या नवीन ग्रंथींच्या सेटची सरासरी लांबी १.५ इंच आहे. हे नासॉफिरिंजियल भागात म्हणजेच नाकाच्या मागे आणि घशाच्या वरच्या बाजूस आढळतात. अॅमॅस्टरडॅममधील नेदरलँड्स कर्करोग संस्थेच्या संशोधकांनी त्यांच्या अहवालात म्हटले आहे की, डोके व मानेच्या कर्करोगाने ग्रस्त असलेल्या रूग्णांना रेडिओथेरपीच्या वेळी होणारा त्रास यामुळे कमी होऊ शकतो.
ओपन अॅक्सेस जर्नल, रेडिओथेरपी आणि ऑन्कोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका पत्रात संशोधकांनी लिहिले आहे की, ‘मानवी शरीरात यापूर्वी शोध न लागलेल्या आणि मॅक्रोस्कोपिक लाळ ग्रंथी अस्तित्वात आहेत. ज्याला ट्यूबरियल ग्रंथीं असे देखील म्हटले जाते. रेडिओथेरपी घेणार्‍या रूग्णांमध्ये या ग्रंथी वाढवून त्यांचे आरोग्य सुधारण्याची संधी मिळू शकते. 

Post a comment

0 Comments