सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 35 लाखांची दंडवसुली

मुंबई: कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने आखून दिलेल्या सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांकडून मुंबई महानगरपालिकेने आतापर्यंत ३५ लाखांचा दंड वसूल केला आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अतिशय गरजेच्या अशा सुरक्षा नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याकरिता विभाग कार्यालय स्तरावर विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत नियम मोडणाऱ्या नागरिकांना गुलाबाचे फुल देऊन त्यांचे प्रबोधनही करण्यात येत आहे. 

त्यासोबतच या नागरिकांना समज मिळावी म्हणून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या कारवाईतून आत्तापर्यंत ३५ लाख ५० हजार ९५० रूपये इतकी दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आलेली आहे. यामध्ये सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या २६  व्यक्तींकडून रू. २६ हजार आणि मास्क न लावणाऱ्या ३४२४ व्यक्तींकडून वसूल करण्यात आलेल्या १६,४८,६५० रुपयांचा समावेश आहे.

Post a comment

0 Comments