हज ला नेतो म्हणून घातला 37 लाखाचा गंडा, फसवणुकीचा गुन्हा दाखलवैजापूर (प्रतिनिधी/ राहुल त्रिभुवन) : 

हज व उमरा यात्रेला घेऊन जाण्याच्या बहाण्याने भाविकांची ३७ लाख रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणातील मुख्य आरोपी मोहम्मद सुलतानोद्दीन शकिलोद्दीन कुरैशी (५०, रा. देगलुर नाका, नांदेड) यास वैजापूर पोलिसांनी अतिशय गुप्त पणे कार्यवाही करत शिताफिने दि.२९रोजी नांदेड येथे अटक केली.

या बाबत अधिक माहिती अशी की वैजापुर येथील स्व.नदीमउल हक व मोइज़ उल हक यानी टूर एंड ट्रेवल्सचा व्यवसाय सुरु केल होता.यांनी शहरातील 20 लोकां कडून वर्ष 2018 आणि 2019 मधे 6 लाख २९ हजार ७७६ रुपये जमा करून हज व उमरा यात्रा साठी ना पाठवल्याने त्यांच्या वर फसवणुकीचा आरोप खाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्या दरम्यान स्व. नदीमुल हक यानी न्यायालय समोर आपल्या सोबत सुद्धा फसवणूक झाल्याचे पुरावे सादर करून न्याय मागितला होता.त्या आधारे नांदेड़ येथील मुख्य आरोपी कुरेशी या भामटयां वर परत गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालय द्वारे देण्यात आले.
नांदेड येथील रहिवासी असलेल्या सुलतानोद्दीन शकिलोद्दीन कुरैशी याने यात्रेकरूंना गंडवल्या प्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. दोन्ही गुन्ह्यात मिळून एकूण ३७ लाख नऊ हजार ५३६ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.सदरिल कार्यवाही वैजापूर पोलिस ठाण्याचे सहाययक पोलिस उपनिरीक्षक राजू राठोड, पोलिस नाईक जालिंदर तमनार,पो.का राम राठोड , महिला पो.का.कविता पवार यांनी या कारवाई करिता महत्त्वपुर्ण भूमिका बजावली.

असा घडला प्रकरण-
सुलतानोद्दीन शकिलोद्दीन कुरैशी रा. नांदेड यांचे वैजापूर येथील जवळचे नातेवाईक सेवा निवृत्त शिक्षक सय्यद नदीम उल हक यांना तुम्ही सेवा निवृत्त झाला आहात आता हज उमरा टूर्स अँड ट्रँव्हल्स चालू करून देतो तुम्ही धार्मिक कार्य करा पुण्य लाभते असे सांगून वैजापूर येथील सलीम कॉम्प्लेक्स येथे 'अल कुरैशी टुर्स अँड ट्रँव्हल्स' नावची शाखा सुरू केली. तेथे धार्मिक यात्रेसाठी यात्रे करुंची नोंदणी सुरू केली. या कंपनीने विश्वास संपादन करून सय्यद नदीम यांच्या कडून जानेवारी २०१८ मध्ये उमरा यात्रेला जाण्यासाठी ११३ जणांनी आगाऊ नोंदणी केली.यावेळी २०१९  मार्च , सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात टप्या टप्याने भाविकांना उमरा यात्रेला मक्का, मदिना येथे नेण्याचे आश्वासन ' अल कुरैशी टुर्स अँड ट्रँव्हल्स'या कंपनी तर्फे देण्यात आले. नोंदणी झाल्यानंतर वैजापूर येथील शाखे तर्फे नांदेड येथील कंपनीच्या खात्यात म्हणजेच सद्या अटकेत असलेला प्रमुख आरोपी सुलतानोद्दीन शकिलोद्दीन कुरैशी व एक फरार आरोपी नामे मोहम्मद इर्शाद बागवान असे दोघा आरोपीच्या खात्यात सय्यद नदीम उल हक यांनी ३७ लाख नऊ हजार ५३६ रुपये जमा केले पण नंतर कंपनीने भाविकांना उमरा यात्रेला नेण्यास टाळाटाळ केली याबाबत विचारना केली त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत धमकी ही दिली .यापूर्वी याच्यावर बोधन निजमाबाद पोलिस ठाण्यात याच प्रकारे फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे

Post a comment

0 Comments