बिहार निवडणुकीत 50 पेक्षा जास्त जागा लढवा

मुंबई : शिवसेनेने बिहार विधानसभा निवडणूक  लढवावी, यासाठी स्थानिक नेत्यांनी पक्षाकडे आग्रह धरला आहे. बिहारमधील शिवसेना नेत्यांनी मुंबईत येऊन सेना खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. शिवसेना आपल्या विचारधारेपासून कधीही यूटर्न घेत नाही. जे या विचारधारेशी सहमत असतील ते आमच्यासोबत येऊ शकतात, असे बिहारचे शिवसेना प्रमुख हौसलेंद्र शर्मा यावेळी म्हणाले. 

शिवसेनेने बिहार विधानसभा निवडणुकीत उतरावे आणि ५० पेक्षा जास्त जागा लढवाव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे. बिहारचे शिवसेना प्रमुख हौसलेंद्र शर्मा यांनी संजय राऊतांची भेट घेतली. राऊत यांनी बिहारमधील पदाधिकाऱ्यांची मागणी ऐकून घेतली. अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील, असे संजय राऊत यांनी नेत्यांना सांगितले

Post a comment

0 Comments