76 वर्षीय वृद्धाची काच आणि दगडाने ठेचून हत्या

मुंबई : राज्यात कोरोनाच्या काळात गुन्ह्यांचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. आताही असाच गंभीर प्रकार मुंबईच्या मुलुंडमध्ये समोर आला आहे. 
मुलुंडमध्ये एका ७६ वर्षीय वृद्धाचा निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पोलीस या प्रकरणात तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मारुती लक्ष्मण गवळी असं मयत इसमाचं नाव असून ते विजय नगर परिसरामध्ये आपल्या कुटुंबियांसोबत राहत होते. पण रात्री झोपण्यासाठी ते हंसा विलामधील सिल्वर क्लास हाऊसजवळ जायचे. गेल्या ६ महिन्यांपासून त्यांचा हा नित्यक्रम होता. पण शुक्रवारची पहाट मात्र या परिसरातील नागरिकांसाठी धक्कादायक ठरली.

Post a comment

0 Comments