कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत पुन्हा आग तांडव..निलेश जांबले दौंड-पुणे,
 दौंड तालुक्यातील कुरकुंभ एमआयडीसी पुन्हा एकदा आगीत जळत आहे,आज पहाटे औद्योगिक वसाहती मधील शिवशक्ती केमिकल कंपनीमध्ये गुरुवारी ( दि, १ ) मध्यरात्री पावणे दोन  वाज़ण्याच्या आसपास ही भिषण आग लागली आहे, या घटनेमुळे परिसरात भिती चे वातावरण पसरले आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न चालू आहेत, जवळपास दोन तास उलटून गेल्यानंतर ही आग विजलेली नसुन कंपनीतील संपूर्ण केमिकल संपेपर्यंत आग राहू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे,  कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत आगीचे सत्र सुरूच असल्याने सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.दरम्यान दौंड चे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले की सदर कंपनीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही असे प्राथमिक दिसून येत आहे , दौंड नगरपालिका, औद्योगिक वसाहतीत मधील अग्निबंब बोलावण्यात आलेले आहेत , कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नका आम्ही घटना स्थळी पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे ,  सदर स्फोटामुळे गाव वाल्यांना किंवा इतर कुणालाही धोका नाही, कंपनीतील सॉल्व्हंट शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली आहे .दौंड व बारामती नगरपालिकेचे सात अग्निशमन बंब, पाच पाण्याचे टँकर ने ही आग विझविण्याचे  काम युद्ध पातळीवर सुरू आहे. 
घटनेचे गांभीर्य ओळखून दौंड पोलीस प्रशासनाने व कुरकुंभ पोलीस चौकीमार्फत यवत, भिगवण, वडगाव निंबाळकर, पुणे ग्रामीण आर्थिक शाखा यांच्या कडुन बंदोबस्त देणात आला होता पुणे ग्रामीण आर्थिक शाखेचे पोलिस निरीक्षक लबडे व पोलीस कर्मचारी, दौंड पोलीस स्टेशन चे पोलीस स्टेशन सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक अमृता काटे, पोलीस हवालदार, पंडीत मांजरे, के.बी.शिदे, सह मोठा बंदोबस्त देणात आला होता...औद्योगिक वसाहतीमधील पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रशासनास संदिप भागवत यांनी खाजगी टॅकरने पाणी पुरवठा केला... अतिरिक्त पोलीसांचा फौज मागवण्यात आली होती....

Post a comment

0 Comments