बाळासाहेब थोरातांच्या घराबाहेर बहिणीचा ठिय्या

शिर्डी : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात  यांच्या घरासमोर बहिणीनेच ठिय्या मांडला होता. मराठा समाजाला आरक्षणाची  ओवाळणी देण्याची गळ यावेळी दुर्गा तांबे यांनी भावाला घातली. 

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात असलेल्या बाळासाहेब थोरात यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी जवळपास एक तासभर ठिय्या मांडला होता. विशेष म्हणजे या आंदोलनात बाळासाहेब थोरात यांच्या भगिनी दुर्गा तांबे आणि मेव्हणे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनीही सहभाग घेतला होता.

Post a comment

0 Comments