नावरात्रीच्या पाचव्या दिवसाच्या रंगाचं महत्व.

औरंगाबाद (योगिता बनसोडे) :- नवरात्रीचा उत्सव हा चैतन्यपूर्ण रंगांचा जल्लोष असतो आणि तो या उत्सवाच्या आरास, पोशाख आणि रांगोळ्या यामध्ये आपल्या सभोवती दिसून येतो.
दुर्गेचे चौथे रूप म्हणजे कुष्मांडा. या देवीला गडद निळा रंग जवळचा आहे म्हणून चौथ्या दिवशी या रंगाची वस्त्र परिधान करावीत.
दुष्कर्म करणाऱ्या आणि राक्षसी शक्तीचा नाश करण्यासाठी या देवीची उपासना करण्यात येते. जेव्हा सृष्टीचं अस्तित्व नव्हतं तेव्हा या देवीनेच ब्रम्हांडाची रचना केली अशी आख्यायिका आहेत. त्यामुळे दुर्गेचे हे आदिशक्ति रूप मानण्यात येते. 

सूर्यमंडळात या देवीचे वास्तव्य असून आठ हात असल्याने ही देवी अष्टभुजा नावानेही प्रचलित आहे. कमंडलू, धनुष्य, बाण, कमळ, अमृतपूर्ण कलश, चक्र आणि गदा अशी आयुध प्रत्येक हातात असून एका हाताने आशिर्वाद देणारी ही देवी सिद्धी प्राप्त करण्यास प्रोत्साहन देते असा समज आहे.
 त्यामुळेच सुखकारक गडद निळा रंग या देवीचा आवडता रंग असल्याचेही सांगण्यात येते. यामुळेच या दिवशी गडद निळ्या रंगाला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. चांगले आरोग्य, संपत्ती आणि बळकटी येण्यासाठी या देवीची आराधना करण्यात येते.

Post a comment

0 Comments