खडसेंना राष्ट्रवादीत मंत्रिपद मिळेल, पण त्यांच्यासोबत कोणीच जाणार नाही; आठवलेंचा दावा

बारामती: माझ्या संपर्कात १५ -१६ आमदार असल्याचा दावा भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे करत असले तरी रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी खडसेंचा हा दावा फेटाळून लावला आहे. खडसे एकटेच राष्ट्रवादीत जातील. त्यांना मंत्रिपदही मिळेल. पण त्यांच्यासोबत १५ आमदार जाणार नाहीत, असा दावा करतानाच त्यांना पक्ष सोडायचाच होता तर त्यांनी रिपाइंत यायला हवं होतं, असं रामदास आठवले म्हणाले. 
रामदास आठवले आज अतिवृष्टीग्रस्त बारामतीच्या दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांना प्रसारमाध्यमांनी खडसेंच्या राजीनाम्याविषयी विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. खडसेंसोबत १५-१६ आमदार राष्ट्रवादीत जाणार नाहीत. ते आमदार नसल्याने राष्ट्रवादीत जाऊन आमदार होतील. त्यांना मंत्रिपदही मिळेल. पण त्यांच्यासोबत कोणीच जाणार नाही, असं आठवले यांनी सांगितलं. खडसेंनी रिपाइंमध्ये यावं अशी माझी इच्छा होती. त्यांना पक्ष सोडायचाच होता तर त्यांना रिपाइं हा चांगला पर्याय झाला असता. पण ते राष्ट्रवादीत गेले आहेत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असंही ते म्हणाले.

Post a comment

0 Comments