नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांनी निष्ठेच्या गप्पा माराव्या? : अर्जुन खोतकर

मुंबई : “ज्या शिवसेनाप्रमुखांनी राणे यांना मुख्यमंत्री केलं, पूर्ण हयात सत्ता दिली, त्या शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत नारायण राणे यांनी खंजीर खुपसलं. त्यांनी निष्ठेच्या गप्पा मारायच्या?”, असा सवाल शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केला. “नारायण राणे यांनी आपण काय बोलतो याचं भान ठेवलं पाहिजे”, असा सल्लादेखील त्यांनी दिला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणात भाजप नेते नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. यावर नारायण राणे यांनी आज (26 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला. 
Post a comment

0 Comments