नक्षलवाद्यांनी ड्रोन किंवा काहीही वापरू द्या, आमच्याकडेही अत्याधुनिक शस्र, गृहमंत्र्यांचा इशारा

नागपूर : गडचिरोलीतील नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी आमचे पोलीस चांगली कामगिरी करत आहेत, अशा शब्दात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांचे कौतुक केले. तसेच नक्षलवाद्यांनी ड्रोन किंवा काहीही वापरू द्या, आमच्या पोलिसांकडे अत्याधुनिक शस्र आहेत, असा इशाराही अनिल देशमुखांनी दिला. 

गडचिरोली जिल्ह्यात किसनेलीच्या जंगलात झालेल्या चकमकीत पाच नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. कोसमी-किसनेली जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी जवानांवर हल्ला केल्याच्या प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारामध्ये ५ नक्षलवाद्यांना ठार करण्यात सी ६० च्या जवानांना यश आले. या परिसरात नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी आमचे पोलीस चांगली कामगिरी करत आहेत. नक्षलवाद्यांनी ड्रोन किंवा काहीही वापरू द्या, आमच्या पोलीसांकडे अत्याधुनिक शस्र आहेत,” असे अनिल देशमुख म्हणाले.

Post a comment

0 Comments