तानाजी दिवेकरच्या दृष्टकृत्यास विरोध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या रणरागिणी सरसावल्या...


निलेश जांबले
दौंड पुणे...
वरवंड येथील भारतीय जनता पार्टीचे नेते तानाजी दिवेकर यांच्यावर व सुनेवर विनयभंग केल्याप्रकरणी व कुटुंबातील इतरांवर यवत पोलिसांनी सोमवारी दि ५.रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता...
अत्याचार विनयभंग करत माहेरी असलेली मालमत्ता मिळवण्यासाठी दमदाटी करत जीवे माराण्याची धमकी दिली असे फिर्यादीत म्हटले होते.... तदनंतर आरोपींना लवकरच अटक होवुन जामिनही झाला मात्र  राजकीय दबावामुळे यातील आरोपींवर कारवाई करण्यास दिरंगाई होत असल्याने दौंड तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष योगिनी दिवेकर सह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला रणरागिणी यांनी यवत पोलिसांना निवेदन देत याप्रकरणी योग्य तपास करुन दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची महिला पदाधिकार्यांनी मागणी केली आहे...
या निवेदनात हाथरस घटनेचा    उल्लेख  करत  त्या भगिनीच्या कहाणीने संपुर्ण देशात हळहळ होत आहे.... त्याचेच महाराष्ट्रात पडसाद उमटु नयेत म्हणून तानाजी दिवेकर दृष्टकृत्यास विरोध पिडीतेस न्याय मिळण्याची मागणी करत हाथरस मधील भगिणीला व मनःपुर्वक अभिवादन म्हटले आहे...हे निवेदनात  वैशाली नागवडे, पुणे जिल्हा अध्यक्षा.
योगीनी दिवेकर, दौड तालुका अध्यक्षा.
ज्योती झुरंगे,ओ.बी.सी सेल-दौड तालुका महिला अध्यक्षा. गौरी दिवेकर,उपाध्यक्षा दौड तालुका युवती. सरिता दिवेकर,सरचिटणीस या राष्ट्रवादीच्या रणरागिणीच्या वतीने हे निवेदन देण्यात आले आहे...

Post a comment

0 Comments