धनगर बांधवांवर भोकरदन, जि. जालना येथे जिवघेणा हल्ला... संभाजी ब्रिगेड कडुन निषेध


निलेश जांबले
दौंड पुणे...मेंढपाळ कुटुंबातील ज्ञानेश्वर जोशी (धनगर) यांच्या वडील व कुटुंबातील इतर 3-4 सदस्यांवर मु. पो. धनगरवाडी ता. भोकरदन जि. जालना येथे शेतात बांधावर फक्त एक शेळी-मेंढी गेल्यामुळे गावातीलच लोकांनी त्यांच्यावर कुर्‍हाडीने हल्ला केला. एका मुलाच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. वडीलधारे असणाऱ्या श्री. रामदास जोशी यांच्या चेहऱ्यावर ७-८ लोकांनी कुर्‍हाडीने वार केल्यामुळे संपूर्ण जबडा फाटला आहे. कुटुंबातील सर्वजण *औरंगाबाद येथील 'घाटी रुग्णालयात' गंभीर स्वरूपात उपचार घेत असून बेशुद्ध  आहेत.* सदर घटना अत्यंत भयानक, दुर्दैवी व लोकशाहीला काळीमा फासणारी असल्यामुळे आज संपूर्ण कुटुंब भयभीत झालं आहे.

मा. खासदार रावसाहेब दानवे, आरोग्यमंत्री मा. राजेश टोपे, मा. अर्जुन खोतकर... तुमच्या जिल्ह्यात महाराष्ट्रातील 'धनगर' समाजावर जर सतत अशा पद्धतीने जीवे मारण्याचे हल्ले होत असतील तर 'महाराष्ट्रातील धनगर समाज सुरक्षित नाही.' याचं उत्तर पंधरा दिवसांतील बारामती नंतर या दुसऱ्या घटनेतून दिसून येत आहे. #मेंढपाळ कुटुंबावर'चा हल्ला हा समस्त महाराष्ट्रावरचा हल्ला आहे. सत्तेची मस्ती असणारे जर गरिबांवर हल्ला करायला लागले तर गरीब माणूस सुरक्षित नाही हे महाराष्ट्राचे चित्र आहे. आम्ही (संभाजी ब्रिगेड) कदापिही सहन करणार नाही. 

जनावरे चारताना हातामध्ये काठी - कुऱ्हाड असते ती रानटी जनावरे आवरायला... आम्ही माणसावर वापरत नाही... (आमची चाकरी करण्यात आयुष्य गेले, भाकरी चोरण्यात नाही.)

ज्यांनी कुऱ्हाडीने वार करून दादागिरी करत गुंडगिरीकरत गरीब कुटुंबाला मारहाण केली, जीवे मारण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर... सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा... अन्यथा गाठ 'संभाजी ब्रिगेड' ची आहे.

 

Post a comment

0 Comments