एमफिल अभ्यासक्रम सुरूच राहणार



- विभागप्रमुख समवेतच्या बैठकीनंतर कुलगुरूंचा निर्णय

- राज्यात सर्वाधिक फेलोशिपप्राप्त विद्यार्थी

-एक नोव्हेंबरपासून प्रवेशासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू

- एकूण १८ विभागात प्रवेश

   औरंगाबाद, दि.३० शुक्रवार : एमफिल, पीएच डी संशोधनासाठी राज्यात सर्वाधिक विद्यार्थी आपल्याकडे आहेत. विद्यार्थ्यांची मागणी व फेलोशिपचे प्रमाण पाहता चालु शैक्षणिक वर्षात एम फिल अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू ठेवण्याचा निर्णय कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी घेतला आहे.

    या संदर्भात डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विभागप्रमुखांची कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली. बैठकीत व्यापक चर्चा होऊन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रम सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र शासनाच्या नवीन धोरणात या अभ्यासक्रमाचा समावेश नाही. तथापि हे धोरण २०२२ पासून लागू होणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेता सदर अभ्यासक्रम सुरू ठेवण्यात आला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार विभागात कार्यरत असलेले प्राध्यापकांची संख्या यावर संबधित विभागातील विद्यार्थ्यांची संख्या निश्चित करण्यात येणार आहे. 
विद्यापीठात सध्या कोण १८ विभागात अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये मराठी , हिंदी, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र , अर्थशास्त्र, समाजशास्त्र, लोकप्रशासन, गणित व वाणिज्यशास्त्र या दहा विभागात अनुदानित अभ्यासक्रम आहेत. तर पाली - बुद्धिझम, ऊर्दू, ग्रंथालयशास्त्र, संगणकशास्त्र, शिक्षणशास्त्र शारीरिक शिक्षणशास्त्र, वृत्तपत्रविद्या व जनसंवाद या आठ विभागातील अभ्यासक्रम हे विनाअनुदान तत्वावर चालवले जात आहेत. 

 *एक नोव्हेंबरपासून ऑनलाईन नोंदणी* 

 एम फिल अभ्यासक्रमांचे प्रवेश हे सीईटीच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत. यासाठी १ ते १० नोव्हेंबर दरम्यान ऑनलाइन नोंदणी करता येईल. २० नोव्हेंबर रोजी ऑनलाइन सीईटी घेण्यात येणार असून २१ रोजी निकाल जाहीर करण्यात येईल. पुढील दहा दिवसात प्रवेश प्रक्रिया राबवून एक डिसेंबरपासून तासिकांना सुरुवात होणार आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्राची परीक्षा दिलेले सर्व विद्यार्थी सीईटीला बसण्यासाठी पात्र आहेत, अशी माहिती पदव्युत्तर विभागाचे उपकुलसचिव डॉ दिगंबर नेटके यांनी दिली. 


Post a comment

0 Comments