काँग्रेस सेवादलाच्या वतीने नियुक्ती पत्र वाटप व नवीन सभासद नोंदणी कार्यक्रम संपन्न,पैठण (प्रतिनिधी विजय खडसन)

काँग्रेस सेवादलाचे पैठण तालुका अध्यक्ष संतोष चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सेवादल यांच्या वतीने पैठण तालुक्यात नवीन सभासदांची नेमणूक करण्यात आली.

 या कार्यक्रमासाठी काँग्रेस सेवादलाचे प्रदेश अध्यक्ष-विलास बापू औताडे, प्रदेश सचिव-सुरेश पवार, जिल्हा अध्यक्ष-निलेश पवार, औरंगाबाद शहर अध्यक्ष-अल्ताफ पटेल, औरंगाबाद तालुका अध्यक्ष-कैलास उकीर्डे, सोशल मीडियाचे-अर्जुन ठोंबरे ,पैठण तालुका अध्यक्ष विनोद पा. तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला. 
यावेळी प्रदेश अध्यक्ष विलास बापू औताडे यांच्या हस्ते सभासदांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले.

यावेळी विलास बापू औताडे यांनी काँग्रेस सेवादलाच्या ध्येय धोरणा बाबत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले, 
यावेळी बोलताना संकटात सापडलेल्याची सेवा करणे जो कोणत्याही जाती धर्माचा असेल, शेतकरी असेल, गरीब मजुर असेल, अशा संकटात सापडलेल्याची मदत करणे काँग्रेस सेवादलाची प्रमुख उदिष्ट असून यातून आपल्याला पक्ष वाढीचे काम करायची आहेत असे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना बोलताना प्रबोधन केले. 

यावेळी काँग्रेस सेवादल तालुका अध्यक्ष संतोष चव्हाण व तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी युवक तालुका अध्यक्ष-किशोर दसपूते, युवक काँग्रेस सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष-संभाजी काटे, अनुसूचित जाती, जमातीचे तालुका अध्यक्ष अनिल मगरे, महेश पवार, किरण जाधव, रावसाहेब बावणे, बबरू कदम सजन भोसले, अजय करकोटक, ज्योतीराम खामकर, सुभान पठाण, विश्वनाथ हांडे, मदनराव शिसोदे, हनुमंत काकडे, बाबुलाल शेख, अय्युब शेख, सुदाम मिसाळ, भीमराव पवार, निजाम शेख, श्रीमंतराव लोखंडे, बंडू भोपळे, रामेश्वर शिंदे, भानुदास चव्हाण, सीताराम मिसाळ, राजू जोगस यांच्या सह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते....
-------------------------------
*प्रतिक्रिया - विलास बापू औताडे.*👇
 काँग्रेस सेवादलाच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये काँग्रेस सेवादल जोडो अभियानाला सुरुवात करण्यात आलेली आहे, आज पैठण येथे अभियानाला सुरुवात करण्यात आली असून पूर्ण भारतामध्ये 2024 पर्यंत काँग्रेस सेवादलाचे जवळपास दोन कोटी सदस्य करण्याचे निश्चित टारगेट आम्ही या ठिकाणी ठेवले आहे.
 आणि दुसरा महत्त्वाचा विषय शेतकरी कामगार विषयी चे धोरण केंद्र सरकार या भाजप सरकारने या ठिकाणी बिल पास केले त्याला विरोध करून मागे घेण्याच्या हिशोबाने आम्ही 2 ऑक्टोबरला मोठ्या प्रमाणात निदर्शने आणि दिवसभर धारणे आंदोलन करणार आहोत, त्या निदर्शने आणि धरणे आंदोलन मध्ये काँग्रेस सेवादलाची संपूर्ण महाराष्ट्र मध्ये आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे.....

 विलास बापू औताडे - महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष, काँग्रेस सेवादल

Post a comment

0 Comments