महिलेचे मुंडके नसलेल्या धडा वरून खून करणाऱ्या आरोपींना गंगापूर पोलिसांनी केले जेर बंद.गंगापुर, दि, २६ रविवार:  पोलीसाकडुन मिळालेल्या माहितीनुसार
 दोरीने पाय बांधलेले एका महीलेचे मुंडके नसलेले धड औरंगाबाद पुणे महामार्गावरिल ढोरेगांव येथील नदीपात्रात आढळून आले होते सदरच्या घटनेवरुन माहीती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे सोबत पोउपनि अर्जुन चौधर कर्मचारी घटनास्थळावर जाऊन तात्काळ सुत्रे हलवुन पंचनामा, पोस्टमार्टम करुन प्रेत ओळखण्यासाठी कारवाई सुरु केली. प्रेताचा फोटो व माहीती प्रसारीत करुन संपुर्ण जिल्हा व महाराष्ट्रात प्रसारित केली.
सदरच्या प्रकरणामध्ये मयताची ओळख पटत नसल्याने सदरचा मर्डर पोलीसांना आव्हान होता. परंतु पोलीस निरीक्षक सुरवसे यांनी स्वतः कडे तपास घेऊन सुत्रे हलवुन सदर गोपनीय माहीतीच्या आधारे  व पोउपनि अर्जुन चौधर ,पोना गणेश खंडागळे ,पोशि अविनाश तमनर मपो शि मीना नाचन यांनी सदर महीला ही अश्वीनी गोरख गरगडे वय 32 वर्ष रा.वरखेड ता. नेवासा हमु. वडगांव
कोल्हाटी एमआयडीसी वाळुज ता. जि. औरंगाबाद हीची तिचे अंगावरील कपडे व पायांतील पैंजण याआधारे तिचे घरच्याकडे विचारपुस करुन तिच्या संबंधाने अधिक माहीती घेतली असता सदर प्रेत हे तिचेच असल्याची खात्री झाली. तिचा खुन का झाला असावा
याबाबत अधिक तपास केला असता
    या महीलेचा खुन तिचा नंदई  दत्तु सयाजी पंडीत वय 29 वर्ष रा. अंमळनेर ता. गंगापुर हा असुन मयत अश्विनी हीची वागणुक चांगली नसल्याने दत्तु नेहमी तिला सांगत होता. परंतु ती ऐकत नव्हती त्यामुळे नातेवाईकांमध्ये आमचा अपमान,बदनामी होत आहे. अश्वीनीच्या घरी राजरोसपणे इतर लोक येतात हे दत्तुला खटकल्याने त्याने अश्वीनीचा खुन करण्याचे ठरविले. ,दत्तु पंडीत रा.अंमळनेर ता.गंगापूर याने त्याचे मित्र
,गणेश पोपट वाकडे रा. भोकर ता.श्रीरामपुर , संतोष कृष्णा राऊतराय रा. निधोना ता.फुलंब्री , देविदास मच्छिंद्र गिरे रा. कात्रड ता. राहुरी वरिल सर्व हमु. वडगांव कोल्हाटी एमआयडीसी वाळुज औरंगाबाद व फरार आरोपी एक यांना प्रत्येकी तीस हजार रुपया मध्ये सुपारी देवुन खुन करण्याचा कट तयार करुन दिनांक 20/08/2020 रोजी रात्री वरिल आरोपीतांनी संगणमत करुन अश्वीनीच्या घरी जाऊन तिला एकटीला पाहुन तिचा प्रथम गळादाबला अर्धवट मेलेल्या स्थीतीत तिला उचलुन पिकअप गाडीत टाकुन अंबेलोहळ मार्गे जात असतांना अंबेलोहळ जवळ सदरची महीलेने पायाची हालचाल केल्याने ती जिवंत असल्याची जाणीव झाल्याने आरोपीने गाडी उभा करुन पुन्हा कोयत्याने तिचा गळा कापला व मुंडके एका कॅरिबॅगमध्ये ठेवुन डेडबॉडी ढोरेगांव जवळ शिवना नदित टाकुन यु टर्न करुन आरोपी औरंगाबादच्या दिशेने पसार झाले. मुंडके सुध्दा पाण्यात टाकुन दिले. याबाबतची सर्व कबुली अरोपींनी दिली आहे. आरोपीस न्यायालयात ऊभे  केले असता न्यायालयाने पोलीस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

Post a comment

0 Comments