शहिद संतोष प्रल्हाद पळसरकर यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त देउळगावराजे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन...तालुक्यातील राजकीय मान्यवरांचीही हजेरी...


निलेश जांबले
दौंड पुणे...


देउळगावराजे येथील वीर सुपुत्र कै. संतोष प्रल्हाद पळसरकर यांचे एक वर्षापूर्वी जम्मू कश्मीर मधील लेह लडाख येथे भारतीय सैन्य दलात सेवा बजावत असताना वीर मरण आले होते, त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित देउळगाव राजे ग्रामस्थ आणि अभिमन्यू गिरमकर मित्र मंडळाच्या वतीने पुणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रोटरी क्लब दौंड आणि संजीवनी रक्त पेढ़ी यांच्या वतीने शनिवारी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते, या वेळी १२३ जनांनी रक्तदान केले.  
या वेळी दौंडचे आमदार राहुल कुल भाजपचे सरचिटणीस वासुदेव काळे , दौंड नगरीचे जेष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया, भारतीय जनता पार्टीचे तालुका प्रमुख माउली ताकवने ,त्रिदल सैनिक सेवा संघाचे तालुका अध्यक्ष शरद शितोळे,खजिनदार मिथुन थोरात, सल्लागार अशोक लोंढे, विनोद जगताप,शिरूर तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब सोनवणे, सचिव नंदकुमार शिंदेआदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

या वेळी रोटरी क्लब दौंड आणि सोमनाथ सोनवणे यांनी चोख व्यवस्था केली होती. शिबीर यशस्वी करण्यसाठी अभिमन्यू गिरमकर आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

Post a comment

0 Comments