पालिकेच्या हलगर्जीपणामुळे अखेर तरुणीचा मृत्यू

नवी मुंबई:-तुर्भे इथं राहणाऱ्या बाळू कसबे यांच्या पूजा कसबे या 20 वर्षीय मुलीला श्वसनाचा त्रास होता, त्यामुळे तिला नेरुळ इथल्या डी वाय पाटील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलं. मात्र तिथे तिच्यावर उपचार न करता तिला नेरुळमधील स्वर्गीय मीनाताई ठाकरे रुग्णालयात पाठवण्यात आलं. पण यानंतर पुन्हा तिला वाशीमधील पालिकेच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. यानंतर ऑक्सिजन लावण्यात आलं आणि तिची कोविड चाचणी केली. पण त्याचा अहवाल निगेटिव्ह आला.
यानंतर वाशीमधूनही तिला नॉन कोविड रुग्णालय पाठवण्याचा सल्ला देण्यात आला. रुग्णालय शोधण्यासाठी वडिलांनी खूप वणवण केली. याचवेळी वाशी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तरुणीला हॉस्पिटलमध्ये दुसऱ्या मजल्यावर हलवण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तिला संबंधित वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं. दरम्यान, पूजा हिला पुन्हा श्वसनाचा त्रास सुरू होतच होता. श्वास कोंडल्यामुळे तिला सतत तहान लागत होती. त्यावेळी तरूणीला ना पाणी देण्यात आलं ना ऑक्सिजन लावण्यात आलं. यावर माझ्या मुलीला निदान पाणी तरी द्या असं वडिलांनी सांगितलं असता ‘आम्ही फक्त टेबलावर काम करतो’ असं उलट उत्तर डॉक्टरांनी दिले.

Post a comment

0 Comments