मराठा आरक्षणावरुन महाविकास आघाडीवर संतापले उदयनराजे भोसले

सातारा:- मराठा आरक्षणाच्या सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी आता चार आठवड्यांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारचा वकील अनुपस्थित असल्यामुळे कोर्टाने सुनावणी पुढे ढकलली होती. यावरुन आता राज्य सरकारवर टीकास्त्र साधले जात आहे. भाजपचे राज्यसभा खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले हे महाविकास आघाडी सरकारवर संतापले आहे.

मराठा आरक्षणावर सरकारची भूमिका संशयास्पद
बुधवारी उदयनराजे भोसले म्हणाले की, सुप्रीम कोर्टाद्वारे मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मंगळवारी पहिल्यांदा सुनावणी होणार होती. मात्र सरकारी वकील उपस्थित नसल्यामुळे सुयानावणी काही काळासाठी पुढे ढकलण्यात आली. यावरुन सरकार मराठा आरक्षणाविषयी गंभीर नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. सरकार आणि वकिलांमध्ये कोणताही समन्वय नसल्याचे यावरुन सिद्ध होते. यामुळे मराठा आरक्षणाविषयी सरकारची भूमिका संशयास्पद आहे अशी टीका उदयनराजे भोसलेंनी केली.

Post a comment

0 Comments