शंकरपूरला जाणारा रस्ता बनला मृत्यूचा सापळा.


गंगापूर 
( प्रतिनिधी प्रकाश सातपुते )
गंगापूर तालुक्यातील शंकरपूर ते भागाठाण रस्ता मृत्यूचा सापळा बनला असल्याचे चित्र सध्या निर्माण झाले आहे कारण शेतमाल बाजारपेठेत नेण्यासाठी व शंकरपूर गावात जाण्यायेण्यासाठी एकमेव रस्ता चिखलमय झाला असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते हेच कळत नसल्याने प्रवाशांना व शेतकर्याना मात्र तारेवरची कसरत करावी लागत आहे.
                         शंकरपूर हे गाव जरी गंगापूर तालुक्यात असले तरी विधानसभा मतदानासाठी हे गाव वैजापूर तालुक्याच्या आमदारांच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने धड गंगापुरचे लोकप्रतिनिधी या गावाकडे लक्ष देत नाही ना धड वैजापूरचे आमदार,लोकप्रतिनिधी या गावाकडे लक्ष देत नाही त्यामुळे शंकरपूर गावाची परिस्थिती आई खाऊ घालींना व बाप भीक मागू देईना अशी झाली असून कोणी लोकप्रतिनिधी लक्ष देईल का असा प्रश्न शंकरपूरसह,आगाठाण,भागाठाण,वसुसायगाव,येथील गावकरी,शेतकरी उपस्थित करत असून या रस्त्याचे काम लवकरात लवकर झाले नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा दिला असून रात्रीच्या वेळी दवाखान्यात जाण्यासाठी या रस्त्याने चारचाकी,दुचाकी गाड्या तर सोडाच धड पायीही चिखलामुळे चालता येत नाही त्यामुळे शाळकरी मुले,वृद्ध माणसे,गर्भवती महिला,या रस्त्याने पडतात अशी माहिती शंकरपूरचे शेतकरी जीवन कहाटे, रघुनाथ पवार,मधुकर पवार,हरिभाऊ पोळ,गयाबाई पवार, आदींनी दिली आहे.

Post a comment

0 Comments