नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारदेशपातळीवर वैद्यकीय क्षेत्रामध्ये घेण्यात आलेल्या नीट (NEET)परीक्षेत विशेष गुणं प्राप्त करून एमबीबीएसला MBBS साठी प्रवेश निश्चित झालेल्या नाभिक समाजातील विद्यार्थ्यांचा मोठ्या उत्साहात नाभिक सेवा संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.
  नुकत्याच झालेल्या नीट परीक्षेमध्ये देशपातळीवर वैद्यकीय प्रवेशासाठी देशभरातील विद्यार्थ्यांनी नीट ची परीक्षा दिली आहे .या परीक्षेमध्ये विशेष गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा आज नाभिक सेवा संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. NEET (नीट) परीक्षेत औरंगाबाद येथील विद्यार्थी प्रीती जाधव यांना 720 पैकी 619 गुण मिळवले आहे तसेच आकाश वाघ यांने 720 पैकी 597 गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे. अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा नाभिक सेवा संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Post a comment

0 Comments