बाळासाहेब विखे पाटील यांचं सर्वच क्षेत्रातील योगदान वाखाणण्यासारखं : पंतप्रधान मोदी

अहमदनगर : दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील लिखित ‘देह वेचावा कारणी या’ आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा आज (१३ ऑक्टोबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. 
या आत्मचरित्र प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे उपस्थित आहेत. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस , भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील , केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसेच विविध पक्षाचे मान्यवर प्रवरानगर येथे कार्यक्रमस्थळी उपस्थित आहेत.गाव, गरीब, सहकार आणि शिक्षणात त्यांचं मोठं योगदान आहे. अनेक येणाऱ्या पिढ्यांना त्यांचं योगदान प्रेरणा देत राहील. वाजपेयींच्या काळात मंत्री असताना देशातील अनेक भागात त्यांनी सहकार चळवळ वाढवली

सहकारासाठी त्यांनी दिलेलं योगदान वाखाणण्यासारखं आहे,” असेही मोदी म्हणाले.“देह वेचावा कारणी हे नावच प्रासंगिक आहे. तुकारामाच्या या अभंगात विखेंच्या जीवनांचं सार आहे. जेव्हा देशात ग्रामीण शिक्षणाची चर्चाही होत नव्हती. तेव्हा प्रवरा ग्रामीण एज्युकेशनच्या माध्यमातून त्यांनी मोठं काम केलं. त्यांचे विचार तरुणांसाठी महत्त्वाचे, ते सत्तेपासून अलिप्त राहिले,” असेही मोदींनी यावेळी सांगितले.

Post a comment

0 Comments