रस्त्याच्या कामाचे फलक न लावल्याने पत्रकारांनी दिले निवेदन
वैजापूर शहर व ग्रामीण भागातील दुरावस्था झालेल्या रस्त्यासंदर्भात आज पत्रकारांनी उपविभागीय अधिकारी श्री मोहन आहेर  यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. शहरात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या कामाची माहिती दर्शविणारे फलक लावण्यात यावे तसेच इस्टीमेट प्रमाणे रस्त्याचे काम व्हावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. ग्रामीण भागातील रस्त्यांविषयी गेल्या १८ दिवसापासून तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या  वैजापूर तालुका कृती समितीच्या उपोषणाला ही पत्रकारांनी भेट देऊन त्यांना पाठींबा जाहीर केला. 

Post a comment

0 Comments