औरंगाबाद शहरातील लाचखोर पोलीस सब इंस्पेक्टर ५००००/- रु. लाच घेताना अटकऔरंगाबाद, (दि.२२) :  सिटीचौक पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेल्या लाचखोर पोलीस सब इंस्पेक्टर संतोष रामदास पाटे ला  बुधवारी उशिरा रात्री ५००००/-  रुपये लाच स्विकारताना औरंगाबाद अँटी करप्शन ब्युरो चे पोलीस इन्स्पेक्टर संदीप राजपूत यांनी त्यांचे सहकाऱ्यासह रंगेहाथ पकडून पोलीस स्टेशन सिटी चौक येथे आज सकाळी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली.

सिटीचौक पोलीस स्टेशन येथे  दाखल असलेल्या एका गुन्ह्यात सह आरोपीला अटक न करण्यासाठी तक्रारदाराकडून पोलीस सब इंस्पेक्टर संतोष पाटे याने बुधवारी ५० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराने पोलीस स्टेशन सिटी चौक हद्दीतच असणारे अँटी करप्शन ब्युरो चे कार्यालय गाठून तक्रार दिली.  अँटी करप्शन ब्युरो चे पोलीस निरीक्षक संदीप राजपूत यांनी त्याची तक्रार लिहून घेतली. आणि आपले वरिष्ठ अधिकारी पोलीस अधीक्षक डॉक्टर राहुल खाडे यांचे मार्गदर्शनाखाली सापळा रचून लाचखोर पोलीस सब इन्स्पेक्टर संतोष पाटे ला ५० हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. 
लाचखोर सब इंस्पेक्टर संतोष पाटे लाचेची ही ५० हजार रुपयाची रक्कम स्वतः हरपणार होता की त्यात त्याचे वरिष्ठांचा पण वाटा होता? वरिष्ठांचे संमतीने त्याने लाचेची मागणी केली होती का? आतापर्यंत त्याने अवैध मार्गाने किती माया जमविली? इत्यादीबाबत अँटी करप्शन ब्युरो सखोल तपास करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 
अँटी करप्शन ब्युरो च्या या कारवाईमुळे सिटी चौक पोलीस स्टेशनचे धाबे दणाणले आहे.
पोलीस इंस्पेक्टर संदीप राजपूत यांना सापळा यशस्वी  करण्यासाठी पोलीस हवालदार  गणेश पंडुरे, पोलीस नाईक गोपाल बरंडवाल, पोलीस शिपाई किशोर म्हस्के, केवल गुसिंगे यांनी सहकार्य केले

Post a comment

0 Comments