भीमा कोरेगाव प्रकरण: स्टॅन स्वामी यांना अटक

  मुंबई:- NIA च्या मुंबईहून आलेल्या एका पथकाने गुरुवारी (८ऑक्टोबर) संध्याकाळी उशिरा त्यांना अटक केली.

बगाईचा भागातल्या त्यांच्या कार्यालयातून त्यांना अटक करण्यात आली. ८३ वर्षांचे स्टॅन स्वामी त्यांच्या कार्यालयातल्याच एका खोलीत एकटे राहतात.

भीमा कोरेगाव प्रकरणामध्ये सहभागी होण्याचा त्यांच्यावर आरोप आहे. NIAने त्यांच्यावर दहशतवाद विरोधी कायदा - UAPA च्या अंतर्गतही गुन्हे दाखल केले आहेत.१९६७ मध्ये अस्तित्त्वात आलेल्या दहशतवाद विरोधी कायद्यामध्ये सध्याच्या मोदी सरकारने गेल्या वर्षी सुधारणा केल्या होत्या.विरोधी पक्ष आणि समाजसेवी संघटनांचा याला प्रखर विरोध होता. या सुधारणेनुसार कोणतीही व्यक्ती वा संस्थेला दहशदवादी असल्याचं जाहीर केलं जाऊ शकतं.

आदिवासींच्या हक्कांसाठी पुढाकार घेणाऱ्या स्टॅन स्वामींवर UAPA सोबतच भारतीय दंड संहिता - IPC च्या अनेक गंभीर कलमांतर्गतही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.NIA ने या अटकेविषयीची माहिती जाहीर केलेली नसली तर बीबीसीकडे याविषयीची अधिकृत कागदपत्रं आहेत. NIA चे अधिक्षक अजय कुमार कदम यांनी स्टॅन स्वामींना अटक करण्यात आल्याला या कागदपत्रांतून दुजोरा दिलाय. या कागदपत्रांची एक प्रत स्टॅन स्वामींनाही देण्यात आली आहे.स्वामींचे सहकारी पीटर मार्टिन यांनी या अटकेच्या वृत्ताला बीबीसीशी बोलताना दुजोरा दिला.

Post a comment

0 Comments