आरोग्य मिशनमध्ये ४०० कोटींचा घोटाळा - देवेंद्र फडणीस.

‪मुंबई : केंद्र सरकारकडून प्राप्त होत असलेल्या निधीतून राष्ट्रीय आरोग्य मिशनची राज्याकडून अंमलबजावणी होत असताना, सेवेत कायम नियुक्त्या देण्याच्या नावाखाली सुमारे 400 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस केला आहे

नॅशनल हेल्थ मिशनच्या माध्यमातून कायमस्वरूपी नियुक्त्या करायच्या होत्या, त्यामध्ये 400 कोटीचा घोटाळा झाल्याचे पत्र देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. हा अत्यंत भयंकर असा प्रकार आहे. प्रत्येक सदस्यांकडून एक ते दीड लाख रुपये घेऊन 500 किंवा 200 च्या नोटा हव्या आहेत अशा प्रकारच्या ऑडिओ क्लिप देखील पुरावे म्हणून देण्यात आले आहे. 

केंद्र सरकार यासाठी पैसे देते ज्याची अंमलबजावणी राज्य सरकार करत असते. आणि म्हणून 20 हजार नियुक्तीच्या माध्यमातून असे पैसे घेतले असतील, तर या घोटाळ्याची तात्काळ चौकशी करावी. यामध्ये बोलवता धनी कोण आहे? यामागचं सूत्रधार कोण आहे? हे राज्यातील जनतेसमोर आणून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे याबाबत  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांना पत्र पाठवले आहे. 


Post a comment

0 Comments