ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून एन.एम.मुकनर यांची निवड.

( बळवंत  थेटे) उमरी,दि.३०: तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली. शासन निर्णयानुसार ऑक्टोबर २०२० मध्ये मुदत संपलेल्या तालुक्यातील दहा ग्रामपंचायतीची मुदत संपली होती.धानोरा बु.बेलदारा,हस्सा,या तिन ग्रामपंचायतीवर विस्तार अधिकारी एन.एम.मुकनर यांची प्रशासक म्हणून निवड करण्यात आली,तर गोळेगाव, रहाटी खु.कळगाव या तिन ग्रामपंचायतीवर विस्तार अधिकारी पि.डी.मुरादे यांची निवड करण्यात आली.शिरूर,रामखडक या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी बि.डी.काकडे यांची नियुक्त केली.तुराटी ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून विस्तार अधिकारी ए.बी.गोरे,तर वाघाळा ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून कृषी विभागाचे विस्तार अधिकारी एस.यु.गटगिळे यांची निवड करण्यात आली.असुन दिलेल्या जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडतील अशी माहिती गटविकास अधिकारी टी.के.नारवटकर यांनी मराठा तेजशी बोलताना सांगीतले.

Post a comment

0 Comments