कनकोरी येथे नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेले दोन तरुण पाण्यात बुडून मृत्यू,


गगापुर( प्रतिनिधी प्रकाश सातपुते )

गंगापूर तालुक्यातील कनकोरी येथील नदीपात्रात असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यात दोन शाळकरी युवक पोहण्यासाठी गेले असता पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात  बुडून मृत्यू झाले आहे
गंगापूर तालुक्यातील कनकोरी येथील दोन युवक चेतन भगवान पवार, महेश बाळासाहेब पवार,  दोन्ही १६ वर्षाचे होते नुकते हे दोघे सोबतच दहावी उत्तीर्ण झाले होते १२ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजेदरम्यान नदीपात्रात असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेले होते मात्र पाणी जास्त असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने या दोघांचे पाण्यात बुडून मृत्यू झाले या घटनेची माहिती ग्रामस्थांना मिळताच वाल्मिक पवार ,रामेश्वर गवळी यांनी धाव घेऊन चेतन व महेश यांना नदीपात्रा बाहेर काढुन नातेवाईकांनी गंगापूर येथील ऊपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत्यू घोषित करुन स्ववविच्छेदन करण्यात आले या प्रकरणी शिल्लेगांव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे तपास पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक रामकृष्ण कवडे,हेड. काँ अमोल करवंदे हे करत आहे या घटनेमुळे कनकोरी गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे  कोरोना व्हायरचे थैमान सुरू असल्याने शाळा महाविद्यालय बंद आहे तसेच यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्याने ग्रामीण भागातील मुले नदीपात्रात पोहण्यासाठी जात आहे आणि पाण्याचा अंदाज येत नसल्याने अशा युवकांना आपला जीव गमवावा लागत आहे

Post a comment

0 Comments