खडसेंनी माझा सर्वाधिक छळ केला, माझं नाव घ्याल तर याद राखा, सोडणार नाही; दमानिया यांचा इशारा

मुंबई: माझा लढा हा भ्रष्टाचाराविरोधात होता. कोणत्याही एका व्यक्तिविरोधात नव्हता. मी नितीन गडकरी आणि छगन भुजबळ यांच्याविरोधातही लढले. पण एकनाथ खडसे यांनी जेवढा माझा छळ केला, तेवढा कोणी केला नसेल, असं सांगतानाच यापुढे कोणत्याही पत्रकार परिषदेत माझं नाव घेतलं तर याद राखा, तुम्हाला सोडणार नाही, असा इशारा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिला. 

 कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या दाव्याचं खंडन करतानाच खडसे यांच्याविरोधील विनयभंगाचा खटला संपलेला नसल्याचं स्पष्ट केलं. आरोपपत्रच अजून दाखल झालेलं नाही तर खटला संपला कसा? असा सवाल करतानाच खडसे याबाबत धांदात खोटं बोलत आहेत, असा दावा दमानिया यांनी केला. खडसे हे खूनशी प्रवृतीचे आहेत. मी भाजपचे नेते नितीन गडकरी आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याविरुद्धही लढले. पण खडसेंनी जेवढा छळ केला तेवढा कुणीच केला नसेल, असं त्या म्हणाल्या.

Post a comment

0 Comments